तुम्ही कोणत्या धातूच्या ताटामध्ये जेवता? जाणून घ्या जेवणासाठी वेगवेगळ्या धातूंच्या भांड्यांचे आश्चर्यकारक फायदे..
आपण दररोज ज्या प्रकारच्या ताटामधून अन्न खातो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. भारतीय संस्कृती आणि विज्ञानानुसार तांबे, पितळ आणि चांदीच्या ताटामध्ये जेवणे अत्यंत फायदेदायक आहे.
Continues below advertisement
Eating in different types of plates & their uses
Continues below advertisement
1/6
मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक केल्याने रोगांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक पोषक तत्वे मिळतात. ही भांडी दुग्धजन्य पदार्थांसाठी आदर्श आहेत आणि अन्नातील १००% पोषक तत्वे टिकवून ठेवण्यास मदत करतात.
2/6
शिजवण्यासाठी कांस्य भांडी वापरल्याने आम्लता नियंत्रित होते आणि भूक वाढते. परेतु, यांमधून आंबट पदार्थ खाऊ नयेत, कारण ते धातूशी प्रतिक्रिया देऊन विषारी बनू शकतात. कांस्य भांड्यात स्वयंपाक केल्याने अन्नातील ९७% पोषक तत्वे टिकून राहतात.
3/6
तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात, रक्त शुद्ध होते, स्मरणशक्ती सुधारते आणि यकृताचे आरोग्य सुधारते.
4/6
पितळेच्या भांड्यातून जेवण केल्याने जंतांचा प्रादुर्भाव, कफाशी संबंधित रोग आणि वात दोष असंतुलन टाळता येते. पितळेच्या भांड्यात स्वयंपाक केल्याने अन्नातील ९३% पोषक तत्वे टिकून राहतात.
5/6
स्टेनलेस स्टीलची भांडी उष्णता किंवा आम्लाशी प्रतिक्रिया देत नाहीत, याचा अर्थ ते तटस्थ राहतात. यामध्ये अन्न खाल्ल्याने शरीराला फारसे नुकसान होत नाही किंवा फायदाही होत नाही.
Continues below advertisement
6/6
अॅल्युमिनियम हे बॉक्साईटपासून बनवले जाते आणि आरोग्यासाठी हानिकारक आहे. ते लोह आणि कॅल्शियम शोषून घेते तसेच अॅल्युमिनियम प्रेशर कुकरमध्ये स्वयंपाक केल्याने अन्नातील ८७% पोषक तत्वे नष्ट होतात.
Published at : 05 Jun 2025 01:14 PM (IST)