Relationship Tips : लग्नापूर्वी 'या' 7 गोष्टी पार्टनरसोबत नक्की बोला! नातं दीर्घकाळ टिकेल..
Relationship Tips : लग्नाआधी तुमच्या पार्टनरबद्दल या सर्व गोष्टी जाणून घ्या यामुळे तुमचं भविष्य सुखी राहू शकतं.
Continues below advertisement
Relationship
Continues below advertisement
1/13
लग्न म्हणजे दोन व्यक्तींचं एकत्र येणं असतं आणि हे नातं आयुष्यभर टिकवायचं असतं.
2/13
म्हणून लग्नाआधी तुमच्या पार्टनरला ओळखणं खूप महत्वाचं असतं. जसे की त्याचा स्वभाव, सवयी आणि विचार जाणून घेणं खूप गरजेचं आहे.
3/13
पार्टनर किती कमवतो आणि किती खर्च करतो हे समजून घ्यावं. पैशांबाबत तो किती जबाबदार आहे हेही जाणून घ्यावं.
4/13
धार्मिक आणि राजकीय विचारांबद्दल चर्चा करणं गरजेचं आहे. दोघांचे विचार एकसारखे आहेत का हे पाहणं योग्य ठरू शकतं.
5/13
बाळं हवीत का नाहीत याबद्दल देखील आधीच बोलणं महत्त्वाचं आहे. कारण या विषयावर मतभेद असल्यास नातं ताणलं जाऊ शकतं.
Continues below advertisement
6/13
पार्टनर कुटुंबाबद्दल काय विचार करतो हे जाणून घ्यावं. लग्न झाल्यावर कुटुंबाची भूमिका काय असेल हे ठरवणं गरजेचं आहे.
7/13
पार्टनर प्रेम कसं व्यक्त करतो हे लक्षात घ्यावं. त्याची ‘लव्ह लँग्वेज’ समजून घेतल्यास नातं अजून जास्त मजबूत टिकून राहतं.
8/13
तसेच पार्टनरकडे तुमचं ऐकण्याची सवय आहे का आणि तुमच्या भावना समजून घेतो का हे देखील जाणून घ्या.
9/13
वाद झाल्यावर तो कसा रिऍक्ट करतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. तो रागात असल्यावर समस्या टाळतो की त्यावर उपाय शोधतो हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
10/13
वाद मिटवण्याची सवय असेल तर नातं टिकून राहतं. पार्टनर इतरांसमोर तुमच्याशी कसं वागतो हे लक्षात घ्या.
11/13
तो तुमची टिंगल करतो का आदराने बोलतो हे पाहा. ही छोटी-छोटी निरीक्षणंचं पुढे नातं टिकवण्यास मदत करतात.
12/13
म्हणून जर लग्नाआधी या सर्व गोष्टी जाणून घेतल्या तर तुमचं भविष्य सुखी राहू शकतं.
13/13
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यातील कोणत्याही आकडेवारीचा दावा करत नाही.)
Published at : 29 Oct 2025 04:31 PM (IST)