New Year Party Look Tips And Tricks : या नवीन वर्षात तुम्हाला वेगळे दिसायचे असेल तर 'या' 5 मेकअप टिप्स वापरून पहा.
जर तुम्हाला या नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये पूर्णपणे वेगळे दिसायचे असेल, तर तुम्ही या काही खास मेकअप टिप्सचा वापर कसू शकतात. या टिप्स वापरून तुम्ही कोणत्याही पार्टीमध्ये उत्कृष्ट दिसू शकता.(Photo Credit : Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्हलाही नवीन वर्षाच्या पार्टीत खास, आकर्षक आणि सुंदर दिसायचे असेल तर जाणून घ्या कोणत्या आहेत या मेकअप टिप्स. (Photo Credit : Pixabay)
लाल लिप कलर : तुम्ही पार्टीमध्ये लाल लिपस्टिक लावू शकता कारण त्यामुळे तुमचा लुक झटपट ग्लॅमरस होतो. नवीन वर्षाच्या पार्ट्या रंगीबेरंगी असल्याने, लाल ओठांचा रंग योग्य दिसू शकतो. (Photo Credit : Pixabay)
हायलाइटिंग: नवीन वर्षाच्या पार्टीसाठी तयार होत असताना, तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर थोडे हायलाइटिंग केले पाहिजे, यामुळे तुमचा संपूर्ण लुक बदलेल. आणि तुम्ही सुंदर दिसू शकता. (Photo Credit : Pixabay)
विंग्ड आयलायनर: विंग्ड आयलायनरमुळे तुमचे डोळे मोठे तर दिसतीलच पण ते खूप सुंदरही दिसतील. तसेच ते ठळक आणि नाट्यमय पद्धतीने तुम्ही वापरू शकतात. (Photo Credit : Pixabay)
ग्लिटरी आय मेकअप: तुमचे डोळे संपूर्ण लूक अधिक सुंदर बनवतात, म्हणून तुम्ही ग्लिटरी आय मेकअप वापरायला हवा. ज्यामुळे तुम्हला पार्टीमध्ये एक परफेक्ट लुक मिळण्यास मदत होईल. (Photo Credit : Pixabay)
तसेच तुम्ही तुमच्या डोळ्यांवर सोनेरी, चांदी किंवा क्रिस्टल सारख्या चमकदार आय शॅडो लावू शकता.(Photo Credit : Pixabay)
परफेक्ट ब्लश: तुमच्या चेहऱ्यावर मॅचिंग लिप कलरचा ब्लश लावा. यामुळे तुम्हाला फ्रेश लुक मिळेल. तसेच तुमचा मेकअप पूर्ण होईल आणि तुम्ही खूप सुंदर व आकर्षक दिसाल.(Photo Credit : Pixabay)
या मेकअप टिप्सचा वापर करून तुम्हीही नवीन वर्षाच्या पार्टीत खास, आकर्षक आणि सुंदर दिसू शकता. तुम्हला जर सुंदर आणि छान दिसायचे असेल तर तुम्ही या टिप्सचा वापर करू शकता. (Photo Credit : Pixabay)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pixabay)