Skin Care Tips : लिंबाचा रस चेहऱ्यासाठी चांगला; पण 'या' पद्धतीने वापरल्यास अत्यंत धोकादायक

खरंतर, लिंबू आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे, परंतु जर तुम्ही त्याचा रस थेट तुमच्या त्वचेवर किंवा चेहऱ्यावर लावला तर त्याचे अनेक दुष्परिणाम दिसू शकतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
लिंबूमध्ये ब्लीचिंग इफेक्ट्स आढळतात, त्यामुळे ते त्वचेसाठी प्रभावी असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते.

लिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे डाग दूर करते. मात्र, तरीही त्याचा रस थेट त्वचेवर लावू नये. कारण त्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
लिंबाचा रसात अनेक गोष्टी जेव्हा मिसळल्या जातात तेव्हाच तो त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतो. यामुळे त्याचा समतोल राखला जातो, परंतु काहीही न मिसळता फक्त लिंबाचा रस त्वचेवर लावल्यास लालसरपणा येतो आणि खाज येण्याची समस्या निर्माण होते.
जर तुम्ही लिंबाचा रस थेट तुमच्या त्वचेवर लावत असाल तर त्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे त्वचेवर सनबर्न होण्याचा धोका वाढतो.
काही लोकांची त्वचा अशी असते की थेट शुद्ध स्वरूपात लिंबाचा रस लावल्याने केमिकल ल्युकोडर्मा आणि फायटोफोटोडर्माटायटीस सारख्या त्वचेच्या समस्यांचा धोका वाढू शकतो. यामुळे खाज आणि जळजळ देखील वाढू शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.