Kitchen Tips : तुमच्या आरोग्याची किल्ली तुमच्याच किचनमध्ये! या चुका टाळाच..

Kitchen Tips : तेल सतत गरम ठेवणे, भांडी उघड्यावर ठेवणे किंवा अन्न मिसळणे आरोग्यास हानिकारक ठरू शकते.

Continues below advertisement

Kitchen Tips

Continues below advertisement
1/11
आपल्या घरच्या स्वयंपाकघरात अन्नाची स्वच्छता आणि योग्य साठवण फार महत्त्वाची आहे.
2/11
काही साध्या काळजीच्या नियमांचे पालन केल्यास अन्नाचा स्वाद आणि पोषण टिकवता येतो, तसेच आरोग्यसुद्धा सुरक्षित राहतं.
3/11
गरम तेल सतत ठेवणे आरोग्यास हानिकारक आहे. तेल जास्त गरम झाल्यास त्यातून विषारी पदार्थ निर्माण होऊ शकतात.
4/11
यामुळे अशा तेलातले अन्न खाणे आपल्या आरोग्यास त्रासदायक ठरू शकते.
5/11
जर तुम्ही लगेच भांडी धुतली नाही तर काळवंड आणि चमक कमी होऊ शकतात. तळलेले किंवा तेलकट भांडी लगेच न धुतल्यास जंतू वाढू शकतात.
Continues below advertisement
6/11
भाजी, मसाले किंवा पीठ उघडे ठेवू नका कारण उघड्यावर ठेवलेले अन्न धूळ आणि माशींना आकर्षित करतात. अन्न नेहमी झाकून ठेवणे गरजेचं आहे.
7/11
जर तुम्ही काही पदार्थ चविष्ट करण्यासाठी जास्त तेल किंवा साखर वापरात असाल तर तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.
8/11
कमी प्रमाणातही योग्य मसाले आणि संयोजन वापरल्यास तुम्ही स्वादिष्ट पदार्थ बनवू शकता.
9/11
ओले आणि कोरडे अन्न मिश्रित करू नका. यामुळे ते खराब होऊ शकतात. नेहमी वेगळे ठेवा आणि साठवताना काळजी घ्या.
10/11
स्वच्छता आणि व्यवस्थित साठवण अन्न सुरक्षित ठेवते. साधी काळजी घेतल्यास अन्नाचा स्वाद आणि पोषण टिकवता येतो.
11/11
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola