Asthma symptoms :दम्याची लक्षणे दुर्लक्षित करू नका, वेळेत ओळखा धोका

दम्यामुळे श्वास घेणे कठीण होते आणि गंभीर परिस्थितीत जीवाला धोका होतो भारतात दरवर्षी सुमारे २,००,००० लोक दम्यामुळे मरतात.

Continues below advertisement

Asthma symptoms

Continues below advertisement
1/9
सर्वात धोकादायक फुफुसांच्या आजाराचा विचार केला तर, दमा हा सर्वात आधी येतो . हा एक असा आजार आहे जो सर्व वयोगटातील लोकांमध्ये पाहायला मिळतो
2/9
दम्याच्या रुग्णांना श्वास घेताना अडचण जाणवते , सूज आणि स्नायूंचा ताण जाणवतो. ही समस्या दिवसेंदिवस वाढतेय आणि आजार गंभीर होत चालला आहे.
3/9
म्हणून तज्ञ सांगतात की या आजारापासून बचावासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. चला, तो कधी धोकादायक होतो आणि भारतात किती लोकांना हा आजार आहे ते जाणून घेऊयात
4/9
2024 च्या अहवालानुसार, दम्यामुळे जगभरात होणाऱ्या मृत्यूंपैकी जवळपास अर्धे मृत्यू भारतात होतात. दरवर्षी सुमारे 2,00,000 लोक दम्यामुळे आपला जीव गमावतात
5/9
भारतामध्ये दम्याचे रुग्ण वाढत आहेत. तज्ञ सांगतात की लवकर उपचार केल्यास दमा रोखता येतो. 2022 मध्ये सुमारे 35 लाख लोक दम्यामुळे प्रभावित झाले आहेत.
Continues below advertisement
6/9
दम्याचा झटका विशेषतः तेव्हा धोकादायक ठरतो जेव्हा श्वास घेणे कठीण होते , चिंता वाढते , इनहेलरनेही आराम मिळत नाही किंवा थोड्या हालचालीतही श्वास घ्यायला त्रास होतो .
7/9
दम्याची लक्षणे व्यक्तीवर अवलंबून वेगवेगळी असतात, जसे श्वास घेणे कठीण होणे, छातीत ताण किंवा वेदना, खोकला आणि चिंता वाटणे, आणि धूळ किंवा अ‍ॅलर्जीच्या संपर्काने ती वाढू शकतात, त्यामुळे अश्यावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
8/9
डॉक्टर्स सांगतात की दमा हा जुना आजार आहे, ज्यात श्वास घेणे कठीण होते , चिंता आणि छातीत जडपणा होऊ शकतो, आणि इनहेलरने आराम न दिल्यास तो खूप धोकादायक ठरतो.
9/9
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Sponsored Links by Taboola