Asafoetida Benefits : चिमूटभर हिंगाचे दुप्पट फायदे! वाचा संपूर्ण माहिती

Asafoetida Benefits

1/7
भारतीय स्वयंपाकघरात मसाल्यांच्या पदार्थांमध्ये एक पदार्थ हमखास आढळतो तो म्हणजे 'हिंग'. दररोज फक्त एक चिमूटभर हिंग खाल्ल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.
2/7
तज्ञांच्या मते, दररोज 3 ग्रॅम हिंग खाल्ल्यास 2% पोटॅशियम, 1% कार्बोहायड्रेट, 10% लोह आणि 1% कॅल्शियमची गरज भागवता येते. हिंगामध्ये अँटी-व्हायरल, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे रोगांपासून आपले संरक्षण करतात. जाणून घ्या त्याचे फायदे.
3/7
दम्याच्या त्रासावर फायदेशीर : हिंगामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-व्हायरल गुणधर्म श्वसनाच्या समस्यांपासून आराम देतात. कोरडा खोकला आणि ब्राँकायटिसच्या समस्येत आराम मिळतो. यासाठी मधामध्ये थोडी हिंग आणि थोडे सुंठ पावडर मिसळून त्याचे नियमित सेवन करावे.
4/7
वृद्धत्व विरोधी गुणधर्म : हिंगामध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म असतात. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. हिंगाच्या सेवनाने टायरोसिनचे उत्पादन कमी होते, जे त्वचेच्या निस्तेजतेमागील मुख्य कारण मानले जाते. हिंग खाण्याव्यतिरिक्त चेहऱ्यावरही लावू शकता.
5/7
पचनक्रिया सुधारण्यास मदत : हिंगाच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते. यामुळे अन्न खाल्ल्यानंतर पोटफुगीचा त्रास होत नाही. जेवणानंतर ताकामध्ये हिंग आणि काळे मीठ मिसळून सेवन करता येते.
6/7
रक्तदाब नियंत्रणावर फायदेशीर : जर तुम्ही उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर हिंगाचे सेवन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. हिंग हे नैसर्गिक रक्त पातळ करणारे मानले जाते.
7/7
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Sponsored Links by Taboola