पीसीओडी आणि पीसीओएस हे दोन वेगळे आजार आहेत? जाणून घ्या फरक!
बर्याचदा पीसीओडी आणि पीसीओएस यामध्ये गोंधळ होतो, पण प्रत्यक्षात हे दोन्ही वेगळे विकार आहेत.
Health Tips
1/10
पीसीओडी म्हणजे अंडाशयामध्ये छोटे-छोटे सिस्ट तयार होऊन ओव्ह्युलेशनमध्ये अडथळा निर्माण होतो.
2/10
हे जीवनशैलीतील बिघाड, चुकीचा आहार किंवा ताणामुळे उद्भवू शकते.
3/10
तर पीसीओएस हा अधिक गंभीर विकार असून हार्मोनल असंतुलनामुळे संपूर्ण शरीराच्या मेटाबॉलिझमवर परिणाम होतो.
4/10
पीसीओडीमध्ये मुख्य लक्षणांमध्ये पाळी अनियमित होणे आणि चेहऱ्यावर किंवा शरीरावर जास्त केस येणे (हिर्सुटिझम) यांचा समावेश होतो.
5/10
पीसीओएसमध्ये मात्र वजन झपाट्याने वाढणे, केसगळती, त्वचेवर मुरुमं आणि प्रजननक्षमतेवर परिणाम दिसू शकतो.
6/10
पीसीओडी योग्य आहार, व्यायाम आणि जीवनशैलीतील बदलांनी नियंत्रित होऊ शकते, त्यामुळे जीवनशैली सुधारण्याचे महत्त्व मोठे आहे.
7/10
पीसीओएसमध्ये मात्र दीर्घकालीन वैद्यकीय उपचारांची गरज भासते आणि हार्मोनल थेरपीची आवश्यकता असते.
8/10
वेळेवर निदान आणि उपचार घेतल्यास दोन्ही अवस्थांमध्ये समस्या नियंत्रित ठेवता येतात आणि आरोग्य सुधारता येते.
9/10
महिलांनी लक्षणं दिसताच तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, कारण योग्य उपचार आणि सल्ला घेतल्यास आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम टाळता येतो.
10/10
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 11 Sep 2025 01:58 PM (IST)