Airpods: एअरपॉड्सचा जास्त वापर; कान आणि मेंदूसाठी किती घातक?
ब्लूटूथ डिव्हाइसेसमधून उत्सर्जित होणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सी वेव्ह्सचा मेंदूवर होणारा दीर्घकालीन परिणाम अद्याप पूर्णपणे सिद्ध नाही, पण तज्ञांच्या मते काळजी घेणं अत्यावश्यक आहे.
Continues below advertisement
एअरपॉड्स
Continues below advertisement
1/9
आजच्या डिजिटल युगात एअरपॉड्स हे आपल्या जीवनाचा भाग बनले आहेत.
2/9
गाणी ऐकणं, कॉल्स घेणं, किंवा काम करताना बॅकग्राऊंड म्युझिक ठेवणं हे सर्व त्यांच्याशिवाय अवघड वाटतं
3/9
पण याच सततच्या वापरामुळे आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
4/9
एअरपॉड्समधून येणारा सततचा आवाज कानाच्या आतल्या नाजूक पेशींना हानी पोहोचवू शकतो, ज्यामुळे ऐकण्याची क्षमता हळूहळू कमी होते
5/9
दीर्घकाळ उच्च आवाजात ऐकल्याने "टिनिटस" म्हणजे कानात गूं गूं ऐकू येणं ही समस्या निर्माण होऊ शकते.
Continues below advertisement
6/9
याशिवाय, ब्लूटूथ डिव्हाइसेसमधून उत्सर्जित होणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सी वेव्ह्सचा मेंदूवर होणारा दीर्घकालीन परिणाम अद्याप पूर्णपणे सिद्ध नाही, पण तज्ञांच्या मते काळजी घेणं अत्यावश्यक आहे.
7/9
त्यामुळे एअरपॉड्सचा वापर दिवसातून मर्यादित वेळेसाठीच करा, आवाजाचं लेव्हल ६०% पेक्षा जास्त ठेवू नका आणि दर तासाला थोडा ब्रेक घ्या.
8/9
थोडी काळजी घेतल्यास तुमचं संगीतही टिकेल आणि कानांचं आरोग्यही
9/9
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 27 Oct 2025 04:40 PM (IST)