Amla Benefits : आवळा आरोग्यासाठी गुणकारी तितकाच घातकही; 'या' आजारांमध्ये चुकूनही खाऊ नका
चवीने तुरट असलेल्या आवळ्यापासून अनेक पदार्थ तयार केले जातात. जसे की, आवळ्याचे लोणचं, चटणी, मुरांबा इ.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआवळा डोळ्यांसाठी, त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी खूप चांगला मानला जातो.
ज्यांना किडनीच्या आजाराने त्रस्त आहे त्यांनी याचे सेवन अजिबात करू नये. कारण ते खाल्ल्याने शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढते
तुम्हाला सर्दी झाली असल्यास आवळ्याचे सेवन करू नये. कारण त्याचा प्रभाव थंड असतो. त्यामुळे शरीराचे तापमान खराब होते.
दृष्टी वाढवण्यासाठी तसेच केस गळती थांबविण्यासाठी आणि चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी आवळ्याचे सेवन करतात.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते.
आवळ्याचा उपयोग युरिन इन्फेक्शन टाळण्यासाठीही केला जातो, यामुळे लघवीचे प्रमाणही नियंत्रित राहते. त्याचबरोबर आवळा अपचनाच्या समस्येपासूनही आराम देतो.
आवळा रिकाम्या पोटी खाल्ल्याने शरीर योग्य प्रकारे डिटॉक्सिफाय होते. चयापचय आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.