Amla Benefits : रोगप्रतिकारशक्ती वाढवायचीय? आवळ्याचे सेवन करा
डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी आणि तुटणारे केस टाळण्यासाठी तसेच चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी आवळ्याचे सेवन करावे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआवळा चयापचय आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवते. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. आवळा पाणी प्यायल्याने वजनही नियंत्रित राहते.
युरिन इन्फेक्शन टाळण्यासाठी आवळ्याचे सेवन केल्याने लघवीचे प्रमाणही नियंत्रित राहते. त्याचबरोबर आवळा अपचनाच्या समस्येपासूनही आराम देतो.
रिकाम्या पोटी आवळा खाल्ल्याने शरीराचे डिटॉक्सिफाईड चांगले होते.
हिवाळ्याच्या थंडीतही याचे सेवन करू नये. कारण आवळ्याची चव थंड असते.
जर तुमच्यावर कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया होणार असेल तर ते अजिबात खाऊ नका. कारण यातील अँटीप्लेटलेट गुणधर्म रक्तस्रावाची समस्या वाढवू शकतात. त्यामुळे शस्त्रक्रियेच्या दोन आठवडे आधी आवळा खाणे बंद करा.
रक्तातील साखर कमी असतानाही आवळा खाऊ नये. यामुळे हायपोग्लायसेमियाचा धोका वाढू शकतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.