Aloe Vera Benefits : फक्त सौंदर्यावरच नाही तर आरोग्याच्या गंभीर समस्याही दूर करतं कोरफड
Aloe Vera Benefits : कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे.
Aloe Vera
1/9
कोरफडीच्या औषधी गुणधर्मांबद्दल सांगायचे तर, त्यात अँटीसेप्टिक, अँटीबायोटिक, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी असे गुणधर्म आढळतात.
2/9
कोरफड देखील मधुमेहासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कोरफडीच्या सेवनाने टाईप 2 मधुमेह असलेल्या रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी काही प्रमाणात संतुलित केली जाऊ शकते. कोरफडीची पाने मधुमेहावरही गुणकारी ठरू शकतात.
3/9
कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोरफडचे सेवन देखील केले जाऊ शकते. NCBI च्या अहवालानुसार, कोरफडच्या सेवनाने केवळ ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी होत नाही तर यकृतातील कॉलेस्ट्रॉल देखील कमी होऊ शकतो.
4/9
कोरफडीत दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. ज्यामुळे ते जळजळ वर प्रभावीपणे काम करू शकते.
5/9
कोरफड तुमच्या शरीराला डिटॉक्सिफाय करते, ज्यामुळे ते निरोगी बनते आणि यकृत योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते.
6/9
कोरफडमध्ये निरोगी एन्झाईम असतात जे पचन सुधारतात. पोट आणि आतड्यांतील जळजळ दूर करतात.
7/9
कोरफड देखील वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते, कारण त्यात अँटी-ओबेसिटी गुणधर्म तुमची लठ्ठपणाची समस्या दूर होते.
8/9
कोरफडीचा रस रिकाम्या पोटी प्यायल्याने अधिक फायदे मिळू शकतात. हा रस सकाळी रिकाम्या पोटी पिणे चांगले.
9/9
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 17 Feb 2023 06:23 PM (IST)