जंक फूड, साखर इत्यादी गोष्टींपासून लांब राहते आलिया; तुम्हीही हे फिटनेस रूटिन फॉलो करू शकता
Alia Bhatt Fitness Mantra : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. आलिया सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिचे वर्क आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करते. आलियाचे इंस्टाग्रामवर 58.1 मिलियन फॉलोवर्स आहेत.
तिचे यूट्यूब चॅनल देखील आहे. आलियासारखा फिटनेस हवा असेल तर तुम्ही हे फिटनेस रूटिन फॉलो केले पाहिजे.
आलिया रोज सकाळी उठल्यानंतर एक ग्लास लिंबू पाणी पिते. ती फिटनेस रूटिंन फॉलो करते ज्यामध्ये ट्रेनिंग डान्स, कार्डियो, स्विमिंग आणि योगा यांचा समावेश आहे.
तसेच ती रनिंग, फंक्शनल ट्रेनिंग आणि किकबॉक्सिंग हे देखील करते. रिपोर्टनुसार आलिया वर्क-आऊटनंतर लिंबू पाणी किंवा नारळ पाणी पिते.
पोहे, सँडविच तसेच साऊथ इंडियन पदार्थ आलिया नाश्त्यामध्ये खाते.
दुपारी आलिया सॅलेड, पोळी आणि वरण हे खाते आणि रात्री आलिया दही भात खाते किंवा सूप पिते.
अभिनय क्षेत्रामध्ये येणाआधी आलियाचं फिटनेसकडे लक्ष नव्हतं. तिचं वजन देखील जास्त होतं. आता ती फिटनेसकडे विशेष लक्ष देऊन जंक फूड, गोड पदार्थ, चिझ, साखर इत्यादी गोष्टींचा समावेश आहारात करत नाही. (all photo: aliabhatt/insta)