Alcohol: दारुमुळे आतड्यांच्या कॅन्सरचा धोका?
बर्थडे सेलिब्रेशन, न्यू इयर सेलिब्रेशन, कधी पॅचअप पार्टी तर कधी ब्रेकअर पार्टी... दारु पिणाऱ्या मंडळींना पार्टी करण्यासाठी कोणतंही कारण पुरेसं असतं. लोकांचं सोडा पण किमान तुमच्या तरी आरोग्याला जपा. कारण तुम्ही पित असलेली ही दारु थेट तुमच्या आतड्यांवर परिणाम करते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्यामुळे कालांतराने तुम्ही कॅन्सरचेही शिकार होवू शकता. हे आम्ही नाही तर डब्ल्यूएचओने तसा इशारा दिलाय.जगभरातील आरोग्य विषयक संशोधन प्रकाशित करणाऱ्या लॅन्सेट या नियतकालिकेतून कॅन्सरविषयक संशोधन प्रकाशित झालंय.
आठवड्याला दीड लीटरपेक्षा कमी वाईन पिणाऱ्यांनाही कॅन्सरचं निदान झाल्याचं समोर आले आहे. साडेतीन लीटरपेक्षा कमी बीअर पिणाऱ्यांनाही कॅन्सरचा धोका असल्याचं संशोधनातून समोर आले आहे. 450 मिलीपेक्षा कमी हार्ड ड्रिंक करणाऱ्यांनाही कॅन्सरचं निदान झाल्याचं समोर धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
म्हणजेच तुम्ही कितीही कमी दारु प्यायलात तरी कॅन्सरचा धोका कायम असल्याचं संशोधनातून समोर आले आहे. माफक प्रमाणात दारु पिणाऱ्या महिलांमध्ये स्तनांचा कॅन्सर आढळण्याचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं संशोधनातून समोर आले आहे.
युरोपमध्ये सर्वाधिक मद्यसेवनामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढल्याचं संशोधनात सांगण्यात आले आहे.
दारु पिण्याचं कोणतं प्रमाण सुरक्षित आहे, असा दावा कुणी करु शकत नाही असा दावा अंमली पदार्थ विषयक तज्ञ डॉ कॅरीना फरेरा बोर्जेस यांनी केलाय. दारुचं प्रमाण जेवढं जास्त असेल तेवढा कॅन्सरचा अधिक धोका असल्याचंही त्या म्हणतात.
म्हणजेच दारुच्या पहिल्या थेंबापासून दुष्परिणाम सुरु होतात.. एकुणच काय तर छोटे छोटे पेगसुद्धा तुमचं किंमती आयुष्य संपवू शकतात. त्यामुळे दारुला महत्व द्यायचं की लाखमोलाच्या शरीराला याचा विचार तुम्हीच कराायला हवा.