आधार असो व पॅन कार्ड, तुमचे सर्व महत्त्वाचे दस्तावेज तुम्ही Whatsapp वरून करु शकता डाऊनलोड, जाणून घ्या कसे!
व्हॉट्सअॅपमुळे आपलं आयुष्य खूप सोपं झालं आहे. दूर बसून तुम्ही मेसेज, कॉल आणि व्हिडिओ कॉलद्वारे कोणाचीही स्थिती जाणून घेऊ शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण तुम्हाला माहिती आहे का की, तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स यासारखी सर्व आवश्यक कागदपत्रे Whatsapp वरून सहज डाउनलोड करू शकता?
फक्त एका नंबरवर व्हॉट्सअॅप मेसेज पाठवून तुम्ही तुमची महत्त्वाची कागदपत्रे कुठेही आणि कधीही डाउनलोड करू शकता. सरकारने ही सुविधा व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना दिली आहे.
यासाठी सरकारने MYGov Helpdesk WhatsApp Chatbot क्रमांक दिला आहे. तुमचे दस्तऐवज डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ते जाणून घ्या!
डिजीलॉकरद्वारे व्हॉट्सअॅपवरून कागदपत्रे डाउनलोड करण्याची सुविधा तुम्हाला मिळेल. डिजिलॉकर सेवेत प्रवेश करण्यासाठी सरकारने MyGov हेल्पडेस्क WhatsApp वर उपलब्ध करून दिला आहे.
तुम्हाला MyGov Helpdesk चा 9013151515 हा क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करावा लागेल. यानंतर, व्हॉट्सअॅपची कॉन्टॅक्ट लिस्ट रिफ्रेश करा आणि चॅटबॅट उघडा आणि Hi संदेश पाठवा.
संदेश पाठवल्यानंतर, तुम्हाला Covin किंवा DigiLocker यापैकी एक निवडण्यास सांगितले जाईल. तुम्ही डिजिलॉकरचा पर्याय निवडा आणि प्रक्रिया केल्यानंतर, होय पर्याय निवडा.
यानंतर, तुम्हाला 12 अंकी आधार क्रमांक DigiLocker खात्याशी लिंक करून प्रमाणीकृत करावा लागेल. यानंतर तुम्हाला एक OTP पाठवला जाईल.
तुम्ही OTP टाका. यासह तुमचा मोबाइल नंबर नोंदणीकृत होईल आणि डिजिलॉकर खात्याशी जोडलेले दस्तऐवज चॅटबॉट सूचीमध्ये दिसेल.
यानंतर तुम्ही तुमच्या कागदपत्रांची PDF फाइल सहज डाउनलोड करू शकता.