महाराष्ट्रात पॅरामेडिकल पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी 'या' वेबसाइटला द्या भेट

महाराष्ट्र राष्ट्रीय आरोग्य अभियानाने विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. ही रिक्त पदे पॅरामेडिकल स्टाफसाठी आहेत. याअंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, Counselor, टेक्निशिअन, प्रसूतीतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ आदी पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी एकूण 87 पदांची भरती केली जाणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महाराष्ट्र राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मार्च 2022 आहे. अंतिम तारखेपूर्वी लवकर अर्ज करा.

तुम्ही देखील पात्र असाल आणि महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर, तुम्ही या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकता. अधिकृत वेबसाइट पत्ता आहे – www.beed.gov.in
या पदांबद्दल तपशीलवार माहिती मिळविण्यासाठी, तुम्ही महाराष्ट्र राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेली सूचना पाहू शकता. यासाठी www.nrhm.maharashtra.gov.in ला भेट द्या.
जर तुमची या पदांसाठी निवड झाली तर तुम्ही दरमहा 60 हजार रुपयांपासून ते 75 हजार रुपये कमवू शकता. पदानुसार पगार वेगवेगळा आहे.