Photo: LIC मध्ये बंपर भरती सुरू, ADO च्या 9394 पदांसाठी अर्ज करा
लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) एलआयसीने अप्रेंटिस डेव्हलपमेंट ऑफिसरच्या पदांसाठी बंपर भरतीची घोषणा केली आहे. त्यासंबंधित नोटीफिकेशन जारी करण्यात आलं असून LIC ADO (अप्रेंटिस डेव्हलपमेंट ऑफिसर्स) या पदासाठी 9394 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLIC ADO भरतीसाठी ऑनलाइन अर्ज 21 जानेवारीपासून सुरू झाले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी LIC च्या अधिकृत वेबसाइट licindia.in ला भेट द्यावी.
यासाठी पात्र उमेदवार 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेतत दक्षिण विभागीय कार्यालय, दक्षिण-मध्य विभागीय कार्यालय, उत्तर-मध्य विभागीय कार्यालय, मध्य-विभागीय कार्यालयासह विविध विभागीय कार्यालयांमध्ये 9 हजारांहून अधिक रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
- ऑनलाइन अर्जाची सुरुवात: 21 जानेवारी 2023 - अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2023 - कॉल लेटर डाउनलोड: 4 मार्च 2023 - प्राथमिक परीक्षेची तारीख: 12 मार्च 2023 - मुख्य परीक्षेची तारीख: 8 एप्रिल 2023
LIC Vacancy 2023: या रिक्त पदांचे तपशील पहा - दक्षिण विभागीय कार्यालय: 1516 पदे - दक्षिण मध्य विभागीय कार्यालय: 1408 पदे - उत्तर विभागीय कार्यालय: 1216 पदे - उत्तर विभागीय कार्यालय: 1216 पदे
- उत्तर मध्य विभागीय कार्यालय: 1033 पदे - पूर्व विभागीय कार्यालय: 1049 पदे - पूर्व मध्य विभागीय कार्यालय: 669 पदे - मध्य विभागीय कार्यालय: 561 पदे - पश्चिम विभागीय कार्यालय: 1942 पदे एकूण रिक्त पदांची संख्या - 9394 पदे
एलआयसीच्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे. याशिवाय तीन ते पाच वर्षांचा अनुभव असण्याची आवश्यकता आहे.
उमेदवाराची वयोमर्यादा 21 ते 30 वर्षे दरम्यान असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. शैक्षणिक पात्रता आणि मर्यादेबद्दल अधिक तपशीलांसाठी, सूचना काळजीपूर्वक वाचा.
या पदांसाठी निवड पहिला ऑनलाईन चाचणी आणि त्यानंतर त्या उमेदवारांच्या मुलाखतीच्या आधारे केली जाईल. ऑनलाईन चाचणी आणि मुलाखतीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना भरतीपूर्व वैद्यकीय चाचणीसाठी बोलावले जाईल.
खुल्या गटातील उमेदवारांसाठी 750 रुपये तर अनुसूचित जाती, जमातीच्या उमेदवारांसाठी 100 रुपये फी आहे. ही फी ऑनलाईन पद्धतीने भरता येऊ शकेल.