बँकेच्या वेगवेगळ्या 9995 पदांसाठी मेगाभरती, अर्ज कसा करावा, फी किती? जाणून घ्या सर्व माहिती!
बँकेत नोकरी करणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. कारण बँकेत सध्या साधारण 9 हजारपेक्षा जास्त रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. सध्या अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही पदभरती इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनतर्फे राबवली जात अूसन या भरती प्रक्रियेतून ग्रामीण बँकांची एकूण 9995 पदे भरली जाणार आहेत.
या पदभरतीसाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया 7 जूनपासून चालू झाली आहे. 27 जूनपर्यंत या पदासाठी अर्ज भरता येणार आहे.
या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ही फक्त ऑनलाईन आहे. अर्ज दाखल करण्यासाठी तुम्हाला आयबीपीएसच्या ibps.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
प्री, मेन्स, मुलाखत अशा परीक्षांच्या माध्यमातून ही निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. या सर्व परीक्षांत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराचीच निवड करण्यात येईल.
अर्ज भरण्यासाठी खुल्या प्रवर्गातील परीक्षार्थीला 850 रुपये शुल्क द्यावे लागेल. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून बँकिंग ऑफिसर, सीए, पीओ, लॉ ऑफिसर इत्यादी पदं भरण्यात येणार आहेत.
या पदांसाठी ऑगस्ट महिन्यात प्री परीक्षा आयोजित केली जाईल आणि निकाल सप्टेंबरमध्ये जाहीर केला जाईल.