दंगल फेम जायरा वसीमने केलं लग्न, चाहत्यांना इंस्टाग्रामवर पोस्ट करून दिली माहिती!
कधी काळी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी ‘दंगल’ फेम अभिनेत्री जायरा वसीम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
Continues below advertisement
Dangal Fame Zaira Wasim Got Married
Continues below advertisement
1/7
कधी काळी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी ‘दंगल’ फेम अभिनेत्री जायरा वसीम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनेक वर्षांपूर्वी तिने चित्रपटसृष्टीचा निरोप घेतला होता, पण आता ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
2/7
नुकतंच जायरा वसीमने लग्न केल्याची माहिती स्वतः इंस्टाग्रामवरून दिली आहे. तिने आपल्या पतीसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये जायरा पारंपरिक वेषात दिसतेय. चाहत्यांनी तिच्या नव्या आयुष्यासाठी कमेंट्स करून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
3/7
जायराने पोस्टमध्ये लिहिलं की, “अल्लाहच्या कृपेने माझं लग्न पार पडलं आहे. या नव्या प्रवासासाठी सगळ्यांनी आमच्यासाठी दुआ करा.” या कॅप्शनमधून तिच्या आयुष्यातील नव्या अध्यायाबद्दलचा आनंद स्पष्ट दिसतो.
4/7
आता तिच्या लग्नाच्या बातमीमुळे चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा उत्सुकता निर्माण झाली आहे. अनेकांनी तिच्या नव्या आयुष्याला शुभेच्छा देत तिच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
5/7
‘दंगल’ चित्रपटात जायरा वसीमने गीता फोगाटच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं आणि तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतर तिने ‘सीक्रेट सुपरस्टार’ आणि ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटांतही काम केलं.
Continues below advertisement
6/7
परंतु, 2019 मध्ये जायरा वसीमने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला. धार्मिक श्रद्धेमुळे आणि अंतर्गत शांततेसाठी तीने हा निर्णय घेतला असं तिने सोशल मीडियाद्वारे सांगितलं होतं. त्यानंतर ती सार्वजनिक कार्यक्रमांपासून आणि सोशल मीडियापासून दूर राहिली होती.
7/7
जायरा वसीमने जरी बॉलिवूडपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असला तरी तिची आठवण आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.
Published at : 18 Oct 2025 04:46 PM (IST)