हसले, खेळले आनंदाने सोबत राहिले, मग 4 वर्षांनी युझवेंद्र-धनश्रीच्या नात्यात मिठाचा खडा कुठे पडला? घटस्फोटाच्या चर्चेला उधाण!
क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदोघांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. सोबतच त्यांनी एकमेकांच्या इन्स्टाग्राम खात्यावरील एकमेकांचे फोटो डिलिट केले आहेत.
दोघांच्याही या कृतीमुळे त्यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चा आहेत. तसेच दोघेही लवकरच घटस्फोट घेणार का? असेही विचारले आहे.
दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर युझवेंद्र चहलने इन्स्टाग्रावर एक स्टोर ठेवली आहे. त्याच्या या सूचक स्टोरीचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.
दरम्यान, करोना महासाथीच्या काळात या दोघांची एकमेकांसोबत ओळख झाली होती. करोना महासाथीत क्रिकेटचे सर्व सामने बंद होते. त्या दरम्यान, युझवेंद्रने नृत्य शिकण्यासाठी धनश्रीशी संपर्क केला होता. त्यानंतर या दोघांमध्ये मैत्री झाली आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.
त्यांच्या लग्नाला एकूण चार वर्षे झाली आहेत. डिसेंबर 2020 या दोघांनीही वाजतगाजत लग्न केले होते. मात्र अवघ्या चार वर्षांत त्यांच्या नात्यात मिठाचा खडा पडल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, या दोघांमध्ये बिनसल्याच्या फक्त चर्चा आहेत. धनश्री आणि युझवेंद्र या दोघांनीही त्यांच्या कथित घटस्फोटाच्या चर्चेवर अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. त्यामुळे हे दोघेही विभक्त होणार का? यासह त्यांच्या नात्यात मिठाचा खडा नेमका का पडला? याबाबतही नेमकी माहिती समोर आलेली नाही.
युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा
युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा