25 तारखेला लग्न, त्याआधी तुफान धम्माल-मस्ती, प्राजक्ता कोळीचे प्री-वेडिंगचे फोटो पाहिलेत का?
यूट्यूबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी सध्या चर्चेत आली आहे. तिचे येत्या 25 फेब्रुवारी रोजी लग्न होणार आहे. याच विवाहसमारंभापूर्वीचे काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
prajakta koli marriage photos
1/8
मराठमोळी यूट्यूबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी सध्या चांगलीच चर्चेत आहे. येत्या 25 फेब्रुवारी रोजी ती लग्न करणार आहे.
2/8
मिसमॅच्ड या वेब सिरीजपासून ती देशभरात प्रसिद्ध झाली आहे. सध्या तिच्या विवाहाआधीच्या वेगवेगळ्या समारंभास सुरूवात झाली आहे. या समारंभांत प्राजक्ता कोळी वेगेगळ्या कपड्यांत आणि वेगवेगळे दागिने परिधान करताना दिसतेय.
3/8
प्राजक्ता कोळी गेल्या बऱ्याच वर्षांपासून वृषांक खनाल याच्यासोबत रिलेशनशीपमध्ये होती. या दोघांनीही आपापल्या इन्स्टाग्राम खात्यावर एकमेकांसोबतचे बरेच फोटो शेअर केलेले आहेत.
4/8
दरम्यान, 23 फेब्रुवारी रोजी प्राजक्ता कोळीला हळद लागली. हा समारंभ मोठ्या थाटामाटात पार पडला. तिच्या हळद समारंभाचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.
5/8
आता तिच्या लग्नाचे प्री-वेडिंग फंक्शन सुरू आहे. या कार्यक्रमाचेही काही फोटो प्राजक्ता कोळीने शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.
6/8
विशेष म्हणजे या फोटोंमध्ये तिचा होणार नवरा वृषांक खनाल हादेखील दिसतोय.या दोघांनीही एकत्र फोटोशूट केलंय. येत्या 25 फेब्रुवारी रोजी ती लग्नबंधनात अडकणार आहे.
7/8
प्राजक्ता कोळी तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत
8/8
प्राजक्ता कोळी आणि वृषांक खनाल
Published at : 24 Feb 2025 03:26 PM (IST)