In Pics | ओम- स्वीटूच्या जीवनाला कलाटणी, मैत्रीच्या नात्याला प्रेमाचं नवं वळण
omsweetu_feature
1/6
एका गोड नात्याची कथा सांगणारी झी मराठीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला आणि अल्पावधीतच ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली.
2/6
अन्विता फलटणकर आणि शाल्व किंजवडेकर या नव्या जोडीनं मालिकेत मुख्य भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.
3/6
प्रत्येक पावलावर स्वीटूला मदत करणारा आणि तिच्या सोबत सावली सारखा उभा राहणारा ओम या दोघांमध्ये घट्ट मैत्री सुरुवातीपासूनच पाहायला मिळाली.
4/6
आता ही मालिका एका वेगळ्या वळणावर आली आहे. जिथं ओम आणि स्वीटूच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर होताना दिसणार आहे. ओम स्वीटू ला प्रपोज करत तिच्यावरील प्रेमाची कबुली देणार आहे.
5/6
मुळात स्वीटूलाही हे सुंदर क्षण खूप हवेहवेसे वाटताहेत. पण, ती आता ओमच्या प्रपोजलवर काय उत्तर देते याचीच प्रेक्षकांना उत्सुकता.
6/6
या दोघांमध्ये असलेली श्रीमंती आणि गरिबीची दरी नात्यात अडथळा ठरेल का? काय असेल मालविका, मोहित आणि मोमोची प्रतिक्रिया? शकू(आई) आणि रॉकीच्या मदतीने ओम नलू मावशी आणि साळवी कुटुंबा कडून दोघांमध्ये बहरणाऱ्या या नवीन नात्याला होकार मिळवू शकेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या येत्या भागांमधून मिळणार आहेत.
Published at : 06 Apr 2021 11:31 AM (IST)