Neena Gupta Birthday: पैशासाठी बी ग्रेड चित्रपटात केले काम, बनली अविवाहित आई, असा होता नीना गुप्ताचा खडतर प्रवास!

अभिनेत्री नीना गुप्ता हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. नीनाला तिच्या बॉलिवूडमधील दुसऱ्या इनिंगमध्ये खूप पसंत केले जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या अभिनेत्रीने आपल्या दमदार अभिनयाने लोकांना इतके प्रभावित केले की तिच्याकडे चित्रपटांची रांग लागली आहे

पण तुम्हाला माहित आहे का की एकेकाळी नीनाला पैसे कमवण्यासाठी घाणेरडे चित्रपट करावे लागायचे.
नीना गुप्ताने 2018 मध्ये 'बधाई हो' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. नीनाची व्यक्तिरेखा आणि तिचे चित्रपटातील काम इतके आवडले की, त्यानंतर तिला एकामागून एक चित्रपटांची ओढ लागली.
नीनाने 'शुभ मंगल यादा सावधान', पंगा यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या शानदार कामाने लोकांची मने जिंकली.
तिच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलताना नीना गुप्ता म्हणाली की, पैसे कमवण्यासाठी मी काही चित्रपटांमध्येही काम केले ज्यामध्ये मला माझी भूमिका आवडली नाही. मी अशी पात्रे साकारली आहेत जी पाहण्यासारखी नाहीत.
चित्रपटांव्यतिरिक्त नीनाने अनेक टेलिव्हिजन शोमध्येही काम केले आहे.
ती 'खानदान', 'सास' आणि 'सिसकी' सारख्या मालिकांमध्ये दिसला आहे.
नीना गुप्ता नेहमीच तिच्या प्रेग्नेंसीबद्दल उघडपणे बोलत असते. 1980 च्या दशकात वेस्ट इंडिजचा क्रिकेटर व्हिव्हियन रिचर्डने आपल्या आयुष्यात प्रवेश केला. विवियन आधीच विवाहित होता, तरीही नीना त्याच्या प्रेमात पडली आणि लग्न न करताच आई झाली.
विवियन आणि नीनाचे नातेही तुटले आणि नीनाने तिची मुलगी मसाबा गुप्ताला एकटीने वाढवले.(pc:neena_gupta/ig)