PHOTO : ज्या पत्नीसाठी विलने होस्टच्या कानाखाली लगावली, तीच आता विलची साथ सोडण्याच्या तयारीत!

Will Smith And Jada Pinket

1/7
काहीच दिवसांपूर्वी भव्य ऑस्कर सोहळा पार पडला. हा सोहळा पुरस्कारांपेक्षा अभिनेता विल स्मिथच्या (Will Smith) ‘थप्पड’ प्रकरणामुळे जास्त चर्चेत आला होता. या प्रकरणामुळे ऑस्कर सोहळ्याला गालबोट लागलं होत.
2/7
पत्नी जाडा पिंकेट-स्मिथ (Jada Pinkett-Smith) हिच्या आजारपणाची खिल्ली उडवल्याने संतापलेल्या विल स्मिथने होस्ट ख्रिस रॉकला जोरदार थप्पड लगावली होती. मात्र, आता या थप्पडचा परिणाम अभिनेत्याच्या वैवाहिक जीवनावरही दिसायला लागला आहे.
3/7
मीडिया रिपोर्टनुसार, ज्या पत्नीसाठी विलने होस्टच्या कानाखाली लगावली, तीच आता विलची साथ सोडण्याच्या तयारीत आहे. ऑस्कर थप्पड प्रकरणानंतर जाडा आणि विल यांच्या नात्यात देखील काही गोष्टी बिनसल्या आहेत.
4/7
दोघेही एकमेकांसोबत जास्त बोलत नसल्याचे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले गेले आहे. आता दोघांमधील तक्रारी इतक्या वाढल्या आहेत की, ही जोडी घटस्फोट घेण्याचा विचार करत असल्याचे म्हटले जात आहे.
5/7
एका मॅगझीन रिपोर्टनुसार विल आणि जाडा दोघांच्या नात्यामध्ये मागील काही काळापासून बेबनाव सुरु आहे. मात्र, ऑस्कर सोहळ्यामधील थप्पड प्रकरणानंतर त्यांच्यातील वाद वाढले आहेत. यामुळेच आता ही जोडी आपापले मार्ग वेगवेगळे करण्याचा विचार करत आहे.
6/7
घटस्फोट झाला तर, विल स्मिथवर याचा मोठा परिणाम होणार आहे. कॅलिफोर्नियाच्या कायद्यानुसार, घटस्फोटानंतर विलला त्याच्या संपत्तीपैकी निम्मी संपत्ती पत्नी जाडाला द्यायला लागणार आहे.
7/7
मीडिया रिपोर्टनुसार, विल स्मिथ सध्या 350 कोटींचा मालक आहे. अर्धी मालमत्ता पत्नीला दिल्यास त्याला आर्थिक नुकसानही होणार आहे. मात्र, अद्याप दोघांनीही यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
Sponsored Links by Taboola