shalin bhanot : शालीन भनोट दुसऱ्यांदा लग्न करणार? इंडस्ट्रीतील चर्चांवर अखेर मौन सोडलं

शालीन भनोट दुसऱ्यांदा लग्न करणार? इंडस्ट्रीतील चर्चांवर अखेर मौन सोडलं

Continues below advertisement

shalin bhanot : शालीन भनोट दुसऱ्यांदा लग्न करणार? इंडस्ट्रीतील चर्चांवर अखेर मौन सोडलं

Continues below advertisement
1/5
टीव्ही अभिनेता आणि ‘बिग बॉस 16’ फेम शालीन भनोट पुन्हा एकदा लग्न करणार असल्याची चर्चा आहे. बराच काळ सिंगल लाइफ जगत असलेल्या शालीनने अखेर आपल्या दुसऱ्या लग्नाबाबत मौन सोडत मोठा खुलासा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
2/5
कुटुंब आणि मित्रांचा लग्नासाठी दबाव शालीन म्हणाला की, त्याचे कुटुंबीय आणि त्याचे जवळचे मित्र त्याला पुढच्या वर्षी लग्न करावे यासाठी आग्रह धरत आहेत. “माझे सगळे मित्र लग्न करून आहेत किंवा रिलेशनशिपमध्ये आहेत. मीच एकटा सिंगल आहे. ते चाहते आहेत की मी पुढच्या वर्षी लग्न करून टाकावं,” असे ते हसत म्हणाले. कुटुंबाबद्दल बोलताना शालीन म्हणाला की, “मी माझ्या आई-वडिलांना देव मानतो. माझा खास दिवस मी फक्त त्यांच्यासोबतच साजरा करणार आहे.”
3/5
स्ट्रेसचे कारणही उघड टाइम्स नाऊशी बोलताना त्यांनी सांगितले की या सर्व लग्नाच्या चर्चांमुळे मी थोडा स्ट्रेसमध्ये आहे. “माझे जवळचे लोक मला सिंगल राहू देत नाहीत. आयुष्यात एक नवीन फेज येणार आहे, म्हणून मी स्ट्रेसमध्ये आहे,” असे त्यांनी कबूल केले.
4/5
पहिले लग्न आणि वैयक्तिक जीवन शालीन भनोटने 2009 मध्ये अभिनेत्री दिलजीत कौरसोबत लग्न केले होते. मात्र 2015 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यांना एक मुलगाही आहे. ‘बिग बॉस 16’ दरम्यान त्याचे नाव अभिनेत्री टीना दत्ता सोबत जोडले गेले होते. यापूर्वी दिलजीत कौर ‘बिग बॉस 13’मध्ये झळकल्या होत्या.
5/5
2026 मध्ये लग्नाची शक्यता सध्या शालीन दुसऱ्या लग्नाबाबत गंभीरपणे विचार करत आहेत. इंडस्ट्रीत अशी चर्चा आहे की 2026 मध्ये अभिनेता पुन्हा विवाहबंधनात अडकू शकतो. मात्र याबाबत शालीनने अजून ठोस अशी माहिती दिलेली नाही.
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola