PHOTO: लग्नानंतर आलिया आणि रणबीर 'या' ठिकाणी जाणार हनीमूनला?
गेल्या वर्षभरात बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधली आहे. पण बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) कधी लग्न करणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. पण लवकरच हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. गेल्या वर्षभरात बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधली आहे. पण बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) कधी लग्न करणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. पण लवकरच हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमीडिया रिपोर्टनुसार, 13 एप्रिलपासून आलिया आणि रणबीरच्या लग्नसोहळ्याला सुरुवात होणार आहे. आता त्यांच्या लग्नासंबंधित नवीन अपडेट समोर आली आहे.
पिंकव्हिलाच्या वृ्त्तानुसार, आलिया आणि रणबीर 15 एप्रिलच्या मध्यरात्री पंजाबी रितीरिवाजांनुसार सात फेरे घेणार आहेत.
आलिया आणि रणबीरचे संगीत, मेहंदी आणि हळदीचे कार्यक्रम तसेच त्यांचा शाही विवाहसोहळा कपूर कुटुंबाचे वडिलोपार्जित घर असलेल्या आरके हाऊसमध्ये पार पडणार आहे.
लग्नानंतर आलिया हॉलिवूडच्या एका सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.
लग्नानंतर आलिया आणि रणबीर हनीमूनला स्वित्झर्लंडला जाणार, असेही म्हटले जात आहे. (all photo:__ranbir_kapoor_official__/ig)