राज अनादकटने तारक मेहता का सोडलं?
'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता राज अनादकट (Raj Anadkat) याने मालिका सोडली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण तो व्लॉग्सच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी जोडलेला आहे. अशाच एका व्लॉगच्या माध्यमातून राजने त्याच्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. यावेळी राजने त्याच्या चाहत्यांना पडलेल्या एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
राजने तारक मेहता ही मालिका का सोडली असा सवाल त्याला वारंवार विचारण्यात येतो. याचं उत्तर राजने त्याच्या व्लॉगमधून दिलं आहे.
त्याचप्रमाणे त्याने त्याच्या आयुष्यात टपूचा प्रवास कसा सुरु झाला याबाबत देखील खुलासा केला आहे.
यावेळी राजने त्याला बिग बॉसची ऑफर आल्याचं देखील म्हटलं आहे. त्यामुळे राज आता बिग बॉसच्या घरात दिसणार का याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागून राहिली आहे.
राजने त्याच्या या व्लॉगमध्ये तारक मेहता का सोडलं याचं कारण सांगताना म्हटलं की, माझ्या मनात नेमकी हा प्रश्न येतो की मी तारक मेहता का सोडलं? मी सलग 5 वर्ष हा कार्यक्रम केला आणि 1000 पेक्षा जास्त एपिसोड्स केले.
हा प्रवास खूप सुंदर होता. पण मला आता दुसऱ्या भूमिका देखील करायच्या आहेत. मला माझ्या करिअरमध्ये ग्रो व्हायचं आहे आणि त्याच दिशेने मला काम करायचं आहे. यासाठी मी मालिका सोडून नवे प्रोजेक्ट्स शोधण्याचा निर्णय घेतला.
राजने यावेळी सांगितलं की त्याला आतापर्यंत दोनदा बिग बॉसची ऑफर आली आहे. त्यावर त्याने म्हटलं की, मला बिग बॉसमध्ये जायला आवडेल.
जर मला संधी मिळाली तर मी नक्की जाईन. मी या कार्यक्रमाचा खूप मोठा फॅन आहे.
मला 2022 आणि 2023 या दोन वर्षात बिग बॉसच्या ऑफर आल्या होत्या, पण काही कारणास्तव मी त्यात सहभागी झालो नाही. पण आता जर मला संधी मिळाली तर मी नक्की त्यामध्ये सहभागी होईन. (pc:raj_anadkat/ig)