गुलीगत आणि झापुकझूपूक डायलॉगमुळे प्रसिद्धीझोतात आलेला सूरज चव्हाण कोण आहे? जाणून घ्या!
बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi New Season) पहिल्या आठवड्यापासूनच एका सदस्याला तुफान सपोर्ट मिळत आहे. सूरजला (Suraj Chavan) जरी हा खेळ समजत नसला तरी खेळ समजून घेण्याच्या त्याच्या प्रयत्नाचं कायमच कौतुक केलं होतंय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे सूरजचं घरात असणं आणि त्याचं टास्कमध्ये खेळणं हे सगळ्यांनाच आवडतंय. खरंतर सूरज ज्या परिस्थितीतून इथवर आला आहे, त्याचं विशेष कौतुक केलं जातंय.
सूरज बारामतीमधल्या एका गावातून बिग बॉसपर्यंत येऊन पोहचला आहे. त्याच्या या प्रवासाविषयी सूरजने बिग बॉसच्या घरात वारंवार भाष्य केलंच आहे.
पण सध्या सोशल मीडियावर एका रीलमुळे पुन्हा एकदा सूरजविषयीचा आदर अनेकांचा वाढला आहे. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरात येताना सूरज फक्त दोन टीशर्टवर आला होता आणि त्याच्या पायातली चप्पल देखील तुटली होती.
सोशल मीडियावर मंदार पडवळ या सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने सूरजसाठी केलेला एक रील बराच व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्याने म्हटलं की, 'बिग बॉसच्या घरात गेलेल्या सदस्यांचे कपडे बऱ्याचदा परत घेतले जातात.
पण सूरजचे कपडे परत घेतले जात नाहीत.ते म्हणतात की पोरगा चांगला आहे, त्याला द्या. दोन शर्टवर सूरज घरात आलेला आहे. तेव्हा त्याच्या पायातली चप्पलही तुटलेली होती.'
पुढे त्याने म्हटलं की, 'घरातमध्ये जाण्यासाठी त्याला सेटवरुन चप्पल दिली, एवढी वाईट परिस्थिती आहे पोराची. तर अशा या मातीतल्या पोराला का नाही सपोर्ट करायचा? ज्याला या शोसाठी काय करायचं हेही माहिती नाही. या शो मध्ये जाण्यासाठी लोकं काय काय करतात. दोन दोन महिने तयारी करतात, चार चार बॅगा भरतात. पण हा पोरगा घरातल्या चपलीवर आणि दोन टीशर्टमध्ये घरात आलाय.'
सूरज चव्हाण हा टिकटॉकच्या माध्यमातून फेमस झाला. त्याच्या गुलीगत आणि झापुकझूपूक डायलॉगमुळे तो बराच प्रसिद्धीझोतात आला.
सोशल मीडियावर त्याचा चाहतावर्गही तयार झाला. त्याचप्रमाणे त्याचे रीलही बरेच व्हायरल होत असतात. त्यामुळे आता बिग बॉसच्याही घरात सूरजला एन्ट्री मिळाली. (pc:official_suraj_chavan1151/ig)