ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चेत 'श्रीमा राय'ची एन्ट्री, अनेकांवर सौंदर्याची जादू करणारी 'ही' आहे तरी कोण? अभिषेकशी नेमकं नातं काय?
अभिषेक-ऐश्वर्या लवकरच घटस्फोट घेणार असल्याचा दावा केला जातोय. या दोघांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचंही म्हटलं जातंय. यातच श्रीमा राय हे नाव चर्चेत आलं आहे.
who is shrima rai (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम, एबीपी नेटवर्क)
1/10
गेल्या काही दिवसांपासून दिग्गज अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत. हे दोघे लवकरच एकमेकांपासून विभक्त होणार असल्याचा दावा केला जातोय.
2/10
गेल्या काही दिवसांपासून हे दोघेही एकमेकांसोबत दिसलेले नाहीत. त्यामुळेच बॉलिवूडमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या या जोडीच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगलेल्या आहेत.
3/10
अभिषेक किंवा ऐश्वर्या या दोघांपैकी कोणीही या चर्चांवर कोणतही स्पष्टीकरण दिलेलं नाही. नव्या वादाला तोंड फुटू नये म्हणून या चर्चांपासून हे दोघेही खूप लांब आहेत. दरम्यान अभिषेक-ऐश्वर्याच्या नात्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा चालू असताना आता श्रीमा राय या नावाची एन्ट्री झाली आहे.
4/10
त्यामुळेच ही श्रीमा राय नेमकी कोण आहे? असं विचारलं जातंय. तिचा आणि ऐश्वर्याचा नेमका संबंध काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
5/10
खरं म्हणजे श्रीमा राय ही ऐश्वर्या रायची नातेवाईक आहे. श्रीमा राय ही ऐश्वर्या रायच्या भावाची पत्नी म्हणजेच ऐश्वर्याची वहिनी आहे.
6/10
श्रीमा राय इन्स्टाग्रावर अॅक्टिव्ह असते. तिचे इन्स्टाग्रावर एकूण 1 लाख 30 हजार फॉलोअर्स आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान, तिने आपल्या एका फॉलोअरला दिलेल्या कमेंटसी सध्या चर्चा होत आहे.
7/10
तुम्ही तुमच्या इन्स्टाग्राम खात्यावर ऐश्वर्या रायसोबतचा एकही फोटो शेअर का करत नाही? असा सवाल एका फॉलोअरने तिला विचारला होता.
8/10
या प्रश्नाला उत्तर म्हणून तुम्ही ऐश्वर्या रायचे इन्स्टाग्राम खाते जाऊन चेक करा. तिच्या खात्यावरही फक्त तिच्या एकटीचेच फोटो आहेत. हे फोटो पाहून तुम्ही संतुष्ट व्हाल, असं ती म्हणाली होती.
9/10
तिच्या याच कमेंटनंतर ऐश्वर्या आणि श्रीमा राय यांच्यात काहीतरी बिनसलेलं आहे का? असं विचारलं जातंय. श्रीमा रायने तिच्या तिच्या फॉलोअरला काही दिवासंपूर्वी हे उत्तर दिलं होतं. पण तिच्या या प्रतिक्रियेची आता चर्चा होत आहे.
10/10
श्रीमा राय ही लाईफस्टाईल ब्लॉगर आहे.ती एक बँकर होती. तिने 2009 साली मिस्ट्रेस इंडिया ग्लोब 2009 हा खिताब जिंकलेला आहे. याआधी तिने मिस्ट्रेस इंडिया या स्पर्धेत उपविजेती ठरलेली आहे.
Published at : 28 Nov 2024 12:51 PM (IST)