Yami Gautam: अभिनेत्री यामी गौतम जेव्हा चित्रपटात जेलर बनते..
यामी गौतम (Yami Gautam), अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि निम्रत कौर (Nimrat Kaur) यांचा ‘दसवी’ (Dasvi) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.(photo:yamigautam/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहा चित्रपट थिएटर ऐवजी OTT वर प्रदर्शित करण्यात आला आहे, जिथे तो सहज कुणालाही पाहता येणार आहे.(photo:yamigautam/ig)
या चित्रपटात अभिषेक बच्चन एका जाट नेत्याच्या भूमिकेत दिसला आहे, तर यामी गौतम या चित्रपटात जेलरच्या भूमिकेत आहे.(photo:yamigautam/ig)
अभिनेत्री यामी गौतम जेव्हा चित्रपटात जेलर बनली, तेव्हा कैद्यांनी शिक्षा कमी करण्याऐवजी वाढवून मागितली होती.(photo:yamigautam/ig)
या वीकेंडला ‘द कपिल शर्मा शो’मध्ये ‘दसवी’ची स्टार कास्ट हजेरी लावणार आहे. त्यामुळे कपिल शर्मा तिन्ही स्टार्ससोबत धमाल करताना दिसणार आहे. यादरम्यान कपिल शर्माने सांगितले की, जेव्हा यामी गौतम चित्रपटाच्या शूटिंगसाठी खऱ्या जेलमध्ये पोहोचली, तेव्हा कैद्यांनी शिक्षा कमी करण्याऐवजी शिक्षा वाढवण्याची विनंती केली होती. हे ऐकून अभिषेक, यामी, निम्रत कौर यांच्यात हशा पिकला. अर्थात हे खरं नसून, हा कपिलचा हा एक छोटासा विनोद होता.(photo:yamigautam/ig)
‘दसवी’मध्ये अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत झळकला आहे, जो हरियाणातील जाट नेता गंगाराम चौधरीची भूमिका साकारत आहे.(photo:yamigautam/ig)
कुठल्यातरी घोटाळ्यात तो तुरुंगात अडकतो, पण इथे जेलर झालेल्या यामी गौतममुळे तो दहावी पास होण्याचा निर्णय घेतो. आता त्याला दहावी उत्तीर्ण होण्यात यश मिळते की नाही, हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल.(photo:yamigautam/ig)