Salman Khan सोबतच्या ब्रेकअपनंतर Aishwarya Rai नं गमावलेले मोठे चित्रपट
अभिनेता सलमान खान याच्यासोबतचं ऐश्वर्या राय हिचं नातं आजही कलाविश्वात चर्चेचा मुद्दा ठरतं. एकेकाळी रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या या जोडीच्या नात्यात काही वर्षांपूर्वी वादळ आलं आणि त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसलमानचा स्वभाव या नात्यामध्ये दुरावा आणण्यास कारणीभूत ठरला. ऐश्वर्या सलमानपासून वेगळी झाली खरी. पण, य़ाचा तिच्या कारकिर्दीवरही परिणाम झाला.
सलमान आणि ऐश्वर्याच्या नात्याचा उल्लेख होतो तेव्हा 'चलते चलते' या चित्रपटाचंही नाव पुढे येतं. या चित्रपटाच्या सेटवर सलमाननं गोंधळ केला होता. शाहरुख खानशीही त्याचे यादरम्यान मतभेद झाले होते.
परिणामी ऐश्वर्याचा चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवत या भूमिकेसाठी राणी मुखर्जीची निवड करण्यात आली. सलमानशी झालेल्या ब्रेअकपनंतर ऐश्वर्या अनेक मोठ्या चित्रपटांना मुकली होती.
एकेकाळी यशशिखरावर असणाऱ्या ऐश्वर्याला या नात्यामुळं पुढं आपल्याहून नवख्या कलाकारांसोबतही स्क्रीन शेअर करावी लागली होती.