7.4 रेटिंगची शॉर्ट फिल्म, ज्यामध्ये 3BHK घेण्यासाठी पै पै साठवतं कुटुंब, अक्षरशः रडवते 2 तास 21 मिनटांची 'ही' फिल्म
Web Series Best Movie 0f 2025: या वर्षी बॉक्स ऑफिसवर असे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले, ज्यांनी केवळ समीक्षक आणि प्रेक्षकांची मनं जिंकली नाहीत, तर बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी रुपये कमावले.
Continues below advertisement
Web Series Best Movie 0f 2025
Continues below advertisement
1/11
'सितारे जमीन पर', क्रेझीएक्स आणि 'केसरी चॅप्टर 2' देखील आले, जे बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकले नाहीत, पण समीक्षकांनी त्यांना खूप पसंती दिली आणि IMDb वर चांगले रेटिंग मिळवलं.
2/11
इथे आम्ही तुम्हाला या वर्षातील आणखी एका सर्वोत्कृष्ट चित्रपटाबद्दल सांगत आहोत, जो बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर OTT वर स्ट्रीम झाला.
3/11
या चित्रपटाचे IMDB रेटिंग 7.4 आहे. हा एक फॅमिली ड्रामा सिनेमा आहे. तो पाहिल्यानंतर तुम्ही खळखळून हसाल आणि क्लायमॅक्स पाहून तुमचे डोळे पाणावतील.
4/11
2 तास 21 मिनिटांचा हा चित्रपट एका कुटुंबाचा 21 वर्षांचा प्रवास दाखवतो. या कुटुंबाचा एकमेव उद्देश 3 बीएचके घर खरेदी करण्याचा आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबाला हे घर खरेदी करताना येणाऱ्या अडचणी या चित्रपटात दाखवल्या आहेत. या चित्रपटाचं नाव '3 बीएचके' आहे.
5/11
'3 बीएचके'मध्ये शरत कुमार, सिद्धार्थ, देवयानी आणि मीठा रघुनाथ मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट अरविंद सच्चिदानंदम यांच्या '3 बीएचके वीडू' या लघुकथेवर आधारित आहे. चित्रपटाची कथा 2006 मध्ये सुरू होते. एक कुटुंब भाड्याच्या घरात राहायला जातं.
Continues below advertisement
6/11
या कुटुंबात वासुदेवन, त्यांची पत्नी शांती आणि त्यांची दोन मुलं प्रभु आणि आरती आहेत. हे एक मध्यमवर्गीय कुटुंब आहे, जे वाढत्या भाड्यानं आणि लहान घरांच्या समस्यांना तोंड देत आहेत. प्रभु एका खाजगी शाळेत शिकतो आणि आरती एका सरकारी शाळेत...
7/11
वासुदेवनच्या कुटुंबात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. त्यांच्या घरात पाण्याची कमतरता, वीजपुरवठा खंडित होणं, भिंती ओल्या होणं आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी पैसे संपणं अशा समस्या आहेत. कुटुंबाचं फक्त एकच स्वप्न आहे, 3 बीएचके घर खरेदी करणं. ते त्यासाठी योजना देखील आखतात.
8/11
वासुदेवनला आयुष्यात कधीच घर खरेदी करता आलं नाही. त्याला त्याचा मुलगा प्रभूला त्याच्यासारखं अपयशी होऊ द्यायचं नाही. म्हणूनच, तो प्रभूला मेकॅनिकल इंजिनिअरिंगऐवजी आयटीचा अभ्यास करण्यास भाग पाडतो, कारण तो हा एक सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर मार्ग मानतो.
9/11
प्रभू त्याच्या वडिलांच्या स्वप्नांमध्ये आणि स्वतःच्या इच्छांमध्ये अडकलेला आहे. दुसरीकडे, आरती तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती समजून घेते आणि तिची छोटी स्वप्ने दाबून कुटुंबाला मदत करते. कुटुंब पहिल्यांदाच घर खरेदी करण्यासाठी जाते तेव्हा त्यांच्याकडे 7.50 लाख रुपये असतात. त्यांना घरासाठी 15 लाख रुपये लागतात.
10/11
जेव्हा वासुदेवन आणि कुटुंब 15 लाख वाचवतात तेव्हा त्या फ्लॅटची किंमत 25 लाख होते. इतके पैसे वाचवल्यानंतर, आरती लग्नाच्या वयात येते, म्हणून कुटुंब तिच्या लग्नावर पैसे खर्च करतं. या सगळ्यामध्ये, वासुदेवनच्या कुटुंबाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं.
11/11
जसं वासुदेवनला नोकरीवरून काढून टाकलं जातं. प्रभू कुटुंबापासून लपवून काम करतो. अशा अनेक गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडतात. तुम्ही हा सिनेमा प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
Published at : 14 Sep 2025 10:10 AM (IST)