हातात ट्रॉफी देवाचे आभार आणि अमृताची चर्चेत असलेली ही पोस्ट !

राधाच्या सौंदर्याची आणि कलात्मकतेची साक्ष देणाऱ्या गौतमी पाटीलचे आश्चर्यकारक फोटो आता पहा!

Amrita Khanvilkar

1/4
परदेशात असताना अमृताला उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून यंदाचा 60 आणि 61 वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला पण ती परदेशात असल्याने हा पुरस्कार दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी स्वीकारला होता आणि आता अमृताच्या घरी " ती " च खास आगमन झालं आणि हीच गोड बातमी तिने सोशल मीडिया वर फोटो पोस्ट करून दिली आहे.
2/4
अमृताने आजवर अनेक हिंदी मराठी चित्रपट स्वतःच्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली एवढं नाही तिच्या नृत्य कौशल्यांचा चर्चा देखील तितक्याच आहेत आणि यंदाचा 60 आणि 61 वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तिला चंद्रमुखी साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. चंद्रमुखी हा चित्रपट अमृतासाठी कायम खास राहिला आहे आणि तिचा हा पहिला वहिला राज्य चित्रपट पुरस्कार असल्याने तो अजून खास झाला आहे.
3/4
अमृता हल्ली अनेक प्रोजेक्ट्स साठी परदेश दौरा करत आहे आणि तिने भारतात परत आल्यावर आज हा खास क्षण सगळ्यांसोबत शेयर केला आहे. आईच्या हातात असलेला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार आणि अमृता असे खास फोटो तिने सोशल मीडिया वर पोस्ट केले आहेत आणि एक भावनिक पोस्ट देखील लिहिली आहे.
4/4
अमृताने सोशल मीडियावर फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट लिहिली – “एकदाचा हातात पुरस्कार आला, खूप आनंद होतोय.” तिने राज्य शासनाचे, चंद्रमुखीच्या संपूर्ण टीमचे, आणि तिच्या प्रवासात सोबत असलेल्या प्रत्येकाचे मनापासून आभार मानले. "स्वामींशिवाय हे शक्य नव्हतं," असं ती नम्रपणे म्हणाली आणि चाहत्यांच्या डोळ्यांत भावनांची नांदी उमटली. आईसोबतचा फोटो, हातात ट्रॉफी, आणि चेहऱ्यावर समाधान – ही पोस्ट अनेकांच्या हृदयाला भिडली.हा अमृताच्या आयुष्यातील पहिलाच राज्य पुरस्कार असल्यामुळे तो तिच्यासाठी विशेष नव्हे, तर अत्यंत अविस्मरणीय ठरला आहे. "आयुष्यात पहिल्यांदा घडलेल्या गोष्टीचं कौतुक काही औरच असतं," असं ती म्हणते आणि ते खरंही आहे. या यशानंतर अमृता लवकरच काही वेगळ्या, नवीन आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. चाहत्यांमध्ये आता तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
Sponsored Links by Taboola