विवेक ओबेरॉयने वयाच्या 19 व्या वर्षी टेक कंपनी स्थापन केलेली, वडिलांची शिकवण आजही ठरतेय उपयोगी!

विवेक ओबेरॉयने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. फार कमी लोकांना माहित असेल की विवेक देखील एक उत्कृष्ट व्यावसायिक आहे.

Vivek OberoiVivek Oberoi Father

1/9
विवेक ओबेरॉयने आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर प्रत्येक भूमिकेत स्वतःला सिद्ध केले आहे
2/9
अभिनेता असण्यासोबतच तो एक बिझनेसमन म्हणूनही ओळखला जातो. त्यांनी अनेक रिअल इस्टेट आणि इतर कंपन्याही स्थापन केल्या आहेत.
3/9
विवेकने त्याचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते सुरेश यांच्या क्षमतेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.अलीकडेच अभिनेत्याने सांगितले की त्याच्या वडिलांनी लहानपणापासूनच एक व्यावसायिकाची मानसिकता त्याच्या मनात बिंबवली आहे.
4/9
विवेकने सांगितले की, तो केवळ १९ वर्षांचा असताना त्याने एक टेक कंपनी स्थापन केली होती. मात्र, वयाच्या 22 व्या वर्षी नफा कमावल्यानंतर त्याने ती विकले.
5/9
अभिनेत्याचे म्हणणे आहे की या काळात त्याला जाणवले की एक कंपनी स्थापन करून आणि नंतर ती MNC ला विकून, स्वतःला आणि गुंतवणूकदारांना नफा मिळवून देणे शक्य आहे.
6/9
विवेक ओबेरॉयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो गेल्या काही काळापासून फार कमी प्रोजेक्ट्स साइन करत आहे.
7/9
बऱ्याच दिवसांनंतर, यावर्षी तो रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये बनलेल्या 'इंडियन पोलिस फोर्स' या पहिल्या वेब सीरिजमध्ये दिसला.
8/9
मात्र, या मालिकेतील अभिनेत्याची भूमिकाही छोटी होती
9/9
सध्या विवेकने त्याच्या पुढील प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही.(pc:vivekoberoi/ig)
Sponsored Links by Taboola