PHOTO: कारकीर्दीतील चढ-उताराबाबत विवेक ओबेरॉय म्हणाला...
विवेकने आपल्या या कारकीर्दीतील चढ-उताराबाबत अनेकदा भाष्य केले आहे.
Continues below advertisement
(photo:vivekoberoi/ig)
Continues below advertisement
1/9
अभिनेता विवेक ओबेरॉयने (Vivek Oberoi) आपल्या कारकिर्दीत चांगले आणि वाईट असे दोन्ही काळ पाहिले आहेत. (photo:vivekoberoi/ig)
2/9
विवेकने आपल्या या कारकीर्दीतील चढ-उताराबाबत अनेकदा भाष्य केले आहे. पुन्हा एकदा विवेक ओबेरॉयने आपल्या करिअरमधील बॅडपॅचबाबत भाष्य केले आहे. (photo:vivekoberoi/ig)
3/9
बहुतांशी बॉलिवूडकरांनी आपल्यावर बहिष्कार घातला होता, तेव्हा एकटा पडला होतो. त्यावेळी अक्षय कुमार (Akshay Kumar) हा एकच अभिनेता पाठिशी उभा राहिला असल्याचे विवेक ओबेरॉयने कृतज्ञतापूर्वक सांगितले.(photo:vivekoberoi/ig)
4/9
विवेक ओबेरॉयने सांगितसले की, आपल्याला मदत होईल यासाठी अक्षय कुमार काही कामे माझ्याकडे पाठवण्यास सुरुवात केली होती. अक्षय कुमारसोबतच्या त्याच्या मैत्रीला खास स्थान असल्याचे विवेक ओबेरॉयने म्हटले.(photo:vivekoberoi/ig)
5/9
त्याने पुढे म्हटले की, त्याच्या कारकिर्दीत डिप्रेशनमधून जात असताना काही मोजक्या लोकांनी मदत केली, त्यात अक्षय कुमारचा वाटा असल्याचे त्याने सांगितले. (photo:vivekoberoi/ig)
Continues below advertisement
6/9
विवेक ओबेरॉयने सांगितले की, करिअरमधील बॅडपॅचमधून जात होतो. करिअरचे तीन तेरा वाजले होते. काहीसा डिप्रेशनमध्ये होतो. त्यावेळी अक्षय कुमारचा फोन आला. त्यावेळी मनातली खदखद सांगितली. त्यानंतर पुढील अर्ध्या तासात अक्षय कुमार माझ्या या घरी उपस्थित होता याचा मला आश्चर्याचा धक्का वाटला असल्याचे विवेक ओबेरॉयने सांगितले. (photo:vivekoberoi/ig)
7/9
आपल्यावर बॉलिवूडने बहिष्कार टाकला असल्याची भावना मनात असल्याचे आपण अक्षय कुमारला सांगितलेच. माझ्या मनातील सर्व काही अक्षय कुमारने ऐकून घेतले आणि त्यानंतर प्रॅक्टिकली अवलंबता येणारा मार्ग काढला. त्यामुळे आपल्या आयुष्याला कलाटणी मिळाली असल्याचे विवेक ओबेरॉयने सांगितले. (photo:vivekoberoi/ig)
8/9
विवेकने सांगितले की, अक्षय कुमारने माझ्या आयुष्यात काय अडचणी निर्माण झाल्या आहेत, याबाबत विचारणा केली. सगळ्या अडचणी, समस्या सांगण्यास सांगितले. माझं सगळं ऐकून घेतल्यानंतर त्याने मी काही मदत करू शकतो असे सांगितले. त्यावेळी अक्षयने त्याच्याकडे येणाऱ्या शोची ऑफर मला देणार असल्याचे सांगितले. त्यावेळी तो चित्रीकरणात व्यस्त होता. त्यामुळे शोचे निमंत्रणे माझ्याकडे पाठवणार असल्याचे सांगितले. (photo:vivekoberoi/ig)
9/9
विवेक ओबेरॉयने पुढे म्हटले की, अक्षय कुमारमुळे मी पुन्हा स्टेजवर परफॉर्मन्स करू लागलो. चाहते प्रोत्साहन देऊ लागले. एक वेगळी सकारात्मक ऊर्जा सभोवताली निर्माण झाली. त्यांनी एक प्रॅक्टिकल तोडगा दिला जेणेकरून माझे उत्पन्न सुरू राहिले आणि मी पुन्हा एकदा लोकांमध्ये राहू लागलो. (photo:vivekoberoi/ig)
Published at : 27 Feb 2024 05:05 PM (IST)