Mukta Barve : ‘व्हायरस परत आलाय!!!’ मुक्ता बर्वेची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत!
अभिनेत्री मुक्ता बर्वेने (Mukta Barve) मागील अनेक वर्षापासून मालिका, चित्रपट आणि नाटक या माध्यमातून आपले दमदार अभिनय कौशल्याद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.(photo:muktabarve/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यानंतर आता मुक्ता आपल्या अभिनयासोबत आपल्या आवाजाच्या जादूनेही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. कथावर्णन करत ती एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आली आहे. काही दिवसापूर्वी 'स्टोरीटेल' मराठीवर तिची ‘Virus -पुणे’ ही एक सीरीज या प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता याचा दुसरा भाग ‘Virus -2 पुणे' घेऊन ती आपल्या भेटीला आली आहे.(photo:muktabarve/ig)
नुकतीच तिनं याची माहिती देणारी एक पोस्ट केली आहे. सध्या मुक्ताची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.(photo:muktabarve/ig)
एका जीवघेण्या व्हायरसच्या निमित्तानं पुण्यावर एक भयंकर संकट कोसळलंय. सगळं शहर पत्त्यांसारखं उन्मळून पडत असताना नेहाच्या मुलीला मायराला काही अज्ञात लोकांनी किडनॅप केलंय. मायरापर्यंत पोचण्यात, तिचा शोध घेण्यात नेहा, दिव्या, सचिन यशस्वी होतील? न भूतो न भविष्यती अशा या संकटातून ते खरंच बाहेर पडतील? नियतीचा हा जीवघेणा खेळ खरंच संपेल? ‘Virus-2 पुणे' या स्टोरीटेल मराठी वरील ऑडिओ सीरीज विषयीची ही तिची पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.(photo:muktabarve/ig)
‘Virus- पुणे’ या मुक्ताच्या सीरीजच्या पहिल्या सीझनला कमाल लोकप्रियता मिळाली होती आणि त्यामुळे दुसऱ्या सीझनची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मुक्ताच्या सीरीजच्या या दुसऱ्या सीझनला देखील स्टोरीटेलवर अद्भुत प्रतिसाद मिळत असून, तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यापूर्वी आलेल्या मुक्ताच्या‘अॅडिक्ट’ या पहिल्या सीरीजलाही प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. यामध्ये डॉ. रक्षा नावाच्या एका महिलेची गोष्ट सांगण्यात आली होती. जिच्या आयुष्यात ती अशा एका घटनेला सामोरे जाते त्यानंतर त्याचे तिला व्यसन लागते. मात्र, हे काही ड्रग्ज, अल्कोहोल इत्यादींचे व्यसन नाही. तिच्या या विचित्र व्यसनामुळे तिचे आयुष्य रंजक आणि भयानक वळण घे(photo:muktabarve/ig)ते.
चाहते देखील मुक्ताच्या या नवीन सीरीजबद्दल विशेष उत्साही आहेत.(photo:muktabarve/ig)