Vijay Raghavendra Wife Spandana : दाक्षिणात्य अभिनेता विजय राघवेंद्रच्या पत्नीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता विजय राघवेंद्रची (Vijay Raghavendra) पत्नी स्पंदना राघवेंद्रचे (Spandana Raghavendra) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविजय राघवेंद्र आणि स्पंदना यांनी 26 ऑगस्ट 2007 रोजी लग्नगाठ बांधली. विजय राघवेंद्र आणि स्पंदना यांच्या लग्नाच्या 16 व्या वाढदिवसाच्या 19 दिवस आधीच स्पंदनाने जगाचा निरोप घेतला आहे.
विजय राघवेंद्र आणि स्पंदना यांना शौर्य नावाचा मुलगा आहे.
स्पंदनाच्या निधनानं राघवेंद्र कुटुंबावर शोककळा पसरली आहे. स्पंदनाचे पार्थिव उद्या (8 ऑगस्ट) बंगळुरूला आणण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
स्पंदनाचा पती विजय राघवेंद्र हा कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. डान्स कर्नाटक डान्स या कार्यक्रमाचे त्यानं परीक्षण केले आहे. विजय राघवेंद्रनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे तसेच त्यानं काही रिअॅलिटी शोमध्ये देखील सहभाग घेतला होता.
विजय राघवेंद्र आणि स्पंदना हे जोडपे थायलंडमध्ये असताना स्पंदनाला हृदयविकाराचा झटका आला. लो ब्लड प्रेशरमुळे स्पंदनाला हृदयविकाराचा झटका आला, असं म्हटलं जात आहे.
अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पंदनाला श्रद्धांजली वाहिली आहे. सय्यद नसीर हुसेन यांनी देखील ट्वीट शेअर करुन स्पंदनाला श्रद्धांजली वाहिली.