19व्या वर्षी 8वर्षांच्या मुलाची झाली होती 'आई', 12 चित्रपट सोडले; TV मालिकांमधून घराघरात पोहोचली अभिनेत्री
Vidya Balan at 47: विद्या बालन आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. तिचा स्ट्रगल सोपा नव्हता.
Continues below advertisement
Vidya Balan at 47
Continues below advertisement
1/10
बोल्ड अँड ब्युटीफूल विद्या बालनचा आज वाढदिवस. तिने 47 व्या वर्षी पदार्पण केलं. तिने जबरदस्त ऑन स्क्रीन अभिनयाने लाखो चाहत्यांना मोहित केलं होतं. तिनं अभिनयाच्या जोरावर नाव कमावले आहे.
2/10
अभिनेत्रीचा जन्म 1 जानेवारी 1979 रोजी मुंबईत झाला होता. विद्याने तिच्या कारकिर्दीत तीन राष्ट्रीय पुरस्कार आणि 3 फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत.
3/10
तिचा प्रवास तसा खडतर होता. बॉडी शेमिंगचा सामना करूनही ही अभिनेत्री टॉपची अभिनेत्री आहे. तिच्याबद्दल न ऐकलेले काही किस्से जाणून घेऊयात.
4/10
विद्याला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. अभिनेत्रीने सुरूवातीला थिएटरमधून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली. तिची आई तिच्या या करिअरच्या विरोधात होती.
5/10
पण तिनं स्वत: च्या जोरावर अभिनय क्षेत्रात आपलं नाव कोरलं. अभिनेत्रीला तिच्या आईने 'हम पांच' या मालिकेत काम करण्यासाठी होकार दिला.
Continues below advertisement
6/10
असे म्हटले जाते की, विद्याने कॉलेज शिक्षण घेण्यासाठी 'हम पांच' ही मालिका सोडली होती. यानंतर तिने फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले. यानंतर विद्याने एका डिटर्जंट पावडरच्या जाहिरातीत काम केले. या जाहिरातीत तिने आठ वर्षांच्या मुलाच्या आईची भूमिका साकारली होती.
7/10
या अॅडचं शुटिंग तिनं केरळला केली होती. एका अॅड कोऑर्डिनेटरने मल्याळम अभिनेता मोहनलाल यांच्याशी भेट घडवून दिली. तिला एका मल्याळम चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारण्यासाठी ऑफर मिळाली होती.
8/10
तिनं या चित्रपटात काम केलं. परंतु, चित्रीकरण होऊनही हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यावेळी विद्याला प्रचंड त्रास झाला.
9/10
जेव्हा मोहनलालसोबत भूमिका करण्याची ऑफर आली तेव्हा, तिला एकाच वेळी 12 चित्रपटांसाठी साइन करण्यात आले होते. जेव्हा मोहनलालचा चित्रपट रद्द करण्यात आला, तेव्हा तिने तिचे सर्व इतर प्रोजेक्ट्सही गमावले. यानंतर ती निराश झाली.
10/10
त्यानंतर तिने 2005 मध्ये आलेल्या परिणीता या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
Published at : 01 Jan 2026 05:49 PM (IST)