Vidya Balan Net Worth: विद्या बालन आहे कोट्यवधींची मालकीन, चित्रपटांपासून दूर राहूनही इतकी आहे कमाई; संपत्ती जाणून व्हाल थक्क
Vidya Balan Net Worth: विद्या बालन तिच्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. विद्या वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट करण्यासाठी ओळखली जाते. विद्या बालन देखील बॉलिवूडमधील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
Vidya Balan Net Worth
1/8
विद्या बालन एका चित्रपटासाठी करोडो रुपये घेते. ही अभिनेत्री बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी तिच्या कमाईवर कोणताही परिणाम झालेला नाही. काही मीडिया रिपोर्टनुसार, विद्या एका चित्रपटासाठी 2 ते 3 कोटी रुपये घेते.
2/8
विद्याचे पती सिद्धार्थ रॉय कपूर यांची एकूण संपत्ती सुमारे 476 मिलियन डॉलर्स इतकी आहे. तर दुसरीकडे पतीपासून कमाईच्या बाबतीत अभिनेत्री स्वतःही मागे नाही. विद्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर करोडोंची संपत्ती कमावली आहे.
3/8
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विद्या बालनची एकूण संपत्ती 18 मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 134 कोटी आहे. चित्रपटांव्यतिरिक्त विद्या ब्रँड एंडोर्समेंट करून लाखोंची कमाई करते.
4/8
विद्या बालनलाही महागड्या कार्सची खूप आवड आहे. तिच्या कार कलेक्शनमध्ये अनेक महागड्या वाहनांचा समावेश आहे. विद्याकडे मर्सिडीज ई-क्लास आणि मर्सिडीज बेंझ सारख्या गाड्या आहेत.
5/8
विद्या बालनने मुंबई आणि खारमध्ये काही अपार्टमेंट खरेदी केले आहेत. तिच्या पतीने तिला 14 कोटी रुपयांचा फ्लॅट गिफ्ट केला आहे. त्याचबरोबर अभिनेत्रीकडे स्वतःचा एक फ्लॅट आहे, ज्याची किंमत 8 कोटी रुपये आहे.
6/8
इतकंच नाही तर विद्या अनेक रिअल इस्टेटची मालकीण आहे. विद्याच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर तिने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली होती. ती पहिल्यांदा 'हम पांच' या कॉमेडी शोमध्ये दिसली होती.
7/8
वर्ष 2011 मध्ये आलेल्या 'द डर्टी पिक्चर' या चित्रपटातून विद्याला खूप प्रसिद्धी मिळाली.
8/8
या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. एवढेच नाही तर विद्याला पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
Published at : 01 Mar 2023 10:58 PM (IST)