Vicky Kaushal Katrina Kaif Haldi Pic : विकी कतरिनाच्या हळदी समारंभाचे खास फोटो; काही क्षणातच फोटो व्हायरल
अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजस्थानच्या सवाई माधोपूर सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडला.
कतरिना कैफ विकी कौशलच्या लग्नाच्या फोटोंना 20 मिनिटांत 1 मिलियन लाइक्स मिळाले होते, आता त्यांच्या हळदीचे फोटो समोर आले आहेत.
विकी आणि कतरिनाने नुकतेच त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर लग्नसोहळ्यातले हे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत.
सिक्स सेन्स फोर्टच्या मर्दाना महलासमोरील मोकळ्या बागेत विकी कतरिनाच्या स्वप्नातील लग्नाचा मंडप उभारला गेला होता. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह शाही आणि पारंपारिक पद्धतीने पार पडला.
कतरिना आणि विकीचा शाही विवाहसोहळा पार पडला. पाहुण्यांसाठी खास मिठाई आणि स्वादिष्ट जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. सवाई माधोपूरच्या जोधपूर स्वीट होमने लग्नसोहळ्यात मिठाई पाठवली होती.
कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या वेडिंग लूकनं साऱ्यांचंच लक्ष वेधलं. (Photo : @katrinakaif/ Instagram)