वनिता खरात आंब्याच्या वनात, साडीमध्ये मराठमोळा लकू; शेअर केले खास फोटो
Vanita Kharat : वनिता खरात आंब्याच्या वनात, साडीमध्ये मराठमोळा लकू शेअर केले खास फोटो
Continues below advertisement
Vanita Kharat
Continues below advertisement
1/9
Vanita Kharat : अभिनेत्री वनिता खरात सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिने सध्या आंब्याच्या वनातील काही खास फोटो शेअर केले आहेत.
2/9
या फोटोंमध्ये वनिता खरात साडीमध्ये आणि मराठमोठ्या अंदाजातील खास फोटो तिने चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.
3/9
वनिताने तिच्या अभिनय क्षेत्रतील कारकिर्दीची सुरुवात 2013 साली केली. तिला खरी ओळख मिळाली ती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या झी मराठीवरील विनोदी कार्यक्रमातून. या शोमध्ये तिच्या बिनधास्त आणि विनोदी अभिनयामुळे तिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं.
4/9
तिने मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. 2019 मध्ये आलेल्या 'कबीर सिंग' या हिंदी चित्रपटात तिने शाहिद कपूरच्या मेडची भूमिका साकारली होती.
5/9
तसेच, 'विकी वेलिंगकर', 'स्कूल कॉलेज आणि लाइफ', 'सलमान सोसायटी', 'फुलवंती' आणि 'इलू इलू 1998' यांसारख्या मराठी चित्रपटांमध्येही ती झळकली आहे.
Continues below advertisement
6/9
वनिताने 'रंग माझा वेगळा', 'सुंदरी', 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.
7/9
'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत तिने 'रंजना' ही भूमिका साकारली होती, ज्यामध्ये ती मालवणी भाषेत संवाद साधताना दिसली. तसेच, 'रानबाजार' या वेबसीरीजमध्येही ती झळकली आहे.
8/9
वनिता खरातने बॉडी पॉझिटिव्हिटीचा संदेश देण्यासाठी एक बोल्ड फोटोशूट केला होता, ज्यामध्ये तिने पतंगासह न्यूड फोटोशूट करून समाजातील सौंदर्याच्या पारंपरिक मापदंडांना आव्हान दिले होते.
9/9
तिने एका मुलाखतीत म्हटले होते की, "मी जगातील सर्वात सुंदर मुलगी आहे," आणि हे आत्मविश्वासाने स्वीकारले पाहिजे.
Published at : 22 Apr 2025 04:49 PM (IST)