Vaishali Thakkar Suicide : 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री वैशाली ठक्करनं संपवलं जीवन; घटनेनं खळबळ
Vaishali Thakkar Suicide : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो ये रिश्ता क्या कहलाता है फेम अभिनेत्री वैशाली ठक्कर (Vaishali Thakkar) हिने आत्महत्या केली आहे.
Vaishali Thakkar Suicide
1/9
टीव्ही इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री वैशाली ठक्कर (Vaishali Thakkar) हिने आत्महत्या केली आहे.
2/9
अभिनेत्रीने इंदूर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वैशालीच्या निधनाच्या बातमीने टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. मात्र, वैशालीने आत्महत्या का केली हा प्रश्न सर्वांनाच पडला असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
3/9
वैशाली ठक्कर गेल्या एक वर्षांपासून टीव्हीपासून दूर होती आणि तिच्या मूळ गावी इंदूरमध्ये राहत होती. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला.
4/9
अभिनेत्रीने गळफास घेण्याआधी एक चिठ्ठीही लिहिली होती. ही चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. मात्र, या सुसाईड नोटमध्ये काय लिहिले आहे, हे अद्याप समोर आलेले नाही.
5/9
मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात पोलिसांनी प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याच्या संशयावरून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असल्याचं बोललं जात आहे.
6/9
वैशाली ठक्कर प्रसिद्ध शो 'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) मध्ये संजनाची भूमिका साकारताना दिसली होती. या शोमधून तिला चांगली ओळखही मिळाली. यानंतर तिने 'ससुराल सिमर का' (Sasural Simar Ka) या शोमध्ये अंजलीची भूमिका साकारली होती.
7/9
वैशालीला गोल्डन पेटल अवॉर्डमध्ये नकारात्मक भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे. या शोनंतर ती 'ये वादा रहा', 'ये है आशिकी', 'ससुराल सिमर का', 'सुपर सिस्टर', 'लाल इश्क' आणि 'विष या अमृत' यांसारख्या शो मध्ये दिसली.
8/9
वैशाली शेवटची 2019 च्या मनमोहिनी शोमध्ये दिसली होती. वैशालीने टीव्हीशिवाय चित्रपटांमध्येही काम केले होते. ती मूळची उज्जैनमधील महिदपूरची होती.
9/9
मिळालेल्या माहितीनुसार, वैशालीची 2021 मध्ये एप्रिल महिन्यात कुटुंबीय आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत एंगेजमेंट झाली होती. मात्र, एका महिन्यानंतरच वैशालीने होणाऱ्या पतीशी लग्न करणार नसल्याचे सांगितले. मात्र, एंगेजमेंट तुटण्याचे कारण अद्याप समोर आले नाही.
Published at : 16 Oct 2022 05:21 PM (IST)