उर्फी जावेदनं इस्लाम धर्म सोडला, स्वत:चं हिंदू नाव ठेवलं? इन्फ्लुएंसरच्या आरोपांवर अभिनेत्रीचा मोठा खुलासा
Urfi Javed Slams Influencers Allegations on Religion: धर्म बदलल्याच्या आरोपांवर उर्फीची पहिली प्रतिक्रिया. नेमकं काय म्हणाली?

Urfi Javed Breaks Silence on Religion Change Rumours
1/8
इन्फ्लुएंसर उर्फी जावेद हटके स्टाईल आणि फॅशनसाठी ओळखली जाते. तिला तिच्या कपड्यांवरून प्रचंड ट्रोल केलं जातं. अलिकडेच उर्फीबाबत एक नवी चर्चा रंगली आहे. उर्फीने धर्म बदलला का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
2/8
उर्फीला इस्लाममधून बाहेर काढले आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशातच उर्फीनं यावर प्रतिक्रिया दिली आहे. उर्फी जावेदनं स्वत:ला नास्तिक असल्याचं सांगितलं.
3/8
उर्फीनं स्पष्टपणे सांगितले की, ती कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवत नाही. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर फैजान अन्सारी याने अलिकडेच असा दावा केला होता की, उर्फीला मुस्लिमांनी इस्लाममधून बाहेर काढले आहे.
4/8
एवढेच नाही तर, तिचे नावही बदलून गीता भारद्वाज असे ठेवण्यात आले आहे, असा दावा त्याने केला. आता उर्फीने फैजानचे दावे फेटाळून लावले आहेत.
5/8
आयएएसशी बोलताना उर्फी म्हणाली, 'मी नास्तिक आहे. तुम्ही मला कुठून काढणार आहात?', असं तिनं म्हटलं.
6/8
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर फैजान अन्सारी याने सांगितले की, "उर्फीला इस्लाममधून बहिष्कृत करण्यात आले आहे. तिचे नाव आता गीता भारद्वाज असे ठेवण्यात येईल", याचा व्हिडिओ त्यानं सोशल मीडियात शेअर केला आहे.
7/8
व्हायरल व्हिडिओमध्ये अन्सारी म्हणाला, "नमस्कार मित्रांनो; मी फैजान अन्सारी. एक मुलगी आहे, जी केवळ भारतातीलच नाही तर, जगभरातील मुस्लिमांचे नाव कलंकित करत आहे. ती मुलगी कुराणवर विश्वास ठेवत नाही".
8/8
"ती मुलगी मुस्लिम धर्मावर विश्वास ठेवत नाही. तिचं आतापर्यंत मुस्लिम नाव उर्फी जावेद असं होतं. ती एक खराब मुलगी आहे, तिनं आतापर्यंत मुस्लिम लोकांचं नाव खराब केलं आहे", असा आरोप त्यानं व्हिडिओतून उर्फी जावेदरवर केला आहे.
Published at : 02 Feb 2026 05:39 PM (IST)