राज काका आणि शर्मिला काकी, शिवतीर्थ भेटीनंतर आदित्य ठाकरेंची पोस्ट, 22 वर्षांनी ठाकरेंचा एकत्र फॅमिली फोटो

Uddhav Thackeray visit Raj Thackeray home : राज काका आणि शर्मिला काकी, शिवतीर्थ भेटीनंतर आदित्य ठाकरेंची पोस्ट, 22 वर्षांनी ठाकरेंचा एकत्र फॅमिली फोटो

Uddhav Thackeray visit Raj Thackeray home

1/10
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना गणेशोत्सवाचं निमंत्रण दिलं होतं.
2/10
त्यानंतर आज (दि.27) उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले. यावेळी ठाकरे कुटुंबियांनी एकत्र फोटोशूट देखील केलेलं पाहायला मिळालं.
3/10
उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आल्यानंतर सहकुटुंब राज ठाकरे यांच्या घरी विराजमान झालेल्या दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.
4/10
यावेळी उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी सहकुटुंब दोन तास होते.
5/10
उद्धव ठाकरे शिवतीर्थावर पहिल्यांदाच आल्यामुळे राज ठाकरे यांनी आपले शिवतीर्थ निवासस्थान उद्धव ठाकरेंना दाखवल्याची माहिती आहे.
6/10
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे कुटुंब एकत्रित पाहायला मिळत असताना त्यांच्यात कौटुंबिक गप्पा सुद्धा झाल्या. या कौटुंबिक गप्पांसोबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साधारणपणे दहा मिनिट एकांतात चर्चा केल्याची माहिती आहे.
7/10
दरम्यान, याबाबत आदित्य ठाकरे यांनी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये आदित्य ठाकरे म्हणाले, पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे व आई सौ. रश्मी ठाकरे ह्यांच्यासह माझे काका मा. राजसाहेब ठाकरे व काकी सौ. शर्मिला ठाकरे ह्यांच्या निवासस्थानी विराजमान श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले.
8/10
त्यासोबतच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी असलेल्या प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे श्रीकांत ठाकरे यांच्या फोटो फ्रेम दाखवत त्या फ्रेम समोर फोटो एकत्रित काढला
9/10
22 वर्षानंतर उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पाहायला मिळाले तर शिवतीर्थ या त्यांच्या नव्या निवासस्थानी ते पहिल्यांदाच आले
10/10
ठाकरे बंधूंनी सहपरिवार एकत्रित जेवणाचा आस्वाद घेतल्याची सुद्धा माहिती आहे.
Sponsored Links by Taboola