11 वर्षांपूर्वी लग्न मोडलं, विजय थलापतीशी जोडलं जातंय नाव; 'अपड़ी पोड़े' फेम अभिनेत्री आजही सिंगल
Trisha Krishnan Chose Career Over Marriage: तृषा कृष्णन सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे.

Trisha Krishnan
1/8
प्रसिद्ध अभिनेत्री तृषा कृष्णन सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अलिकडेच अभिनेता विजय थलापतीची पत्नी संगीताने चेंगलपट्टू कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. तिनं आपल्या पतीवर अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला. यामुळे तृषाचं नाव चर्चेत आलं आहे.
2/8
तृषा बऱ्याचदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. तिचा 11 वर्षांपूर्वी तिचा साखरपुडा झाला होता. मात्र, तिचा साखरपुडा मोडला. यानंतर ती आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिली आहे.
3/8
फार कमी लोकांना माहिती आहे की, तृषा कृष्णनचं लग्न ठरलं होतं. 11 वर्षांपूर्वी तिचं लग्न ठरलं होतं. 2015 साली तिचा साखरपुडा चेन्नईतील बिझनेसमॅन वरुण मनियां यांच्याशी झाला होता.
4/8
त्यावेळी साऊथ इंडस्ट्रीत या कपलची प्रचंड चर्चा रंगली होती. अगदी मोजक्या लोकांमध्ये अभिनेत्री तृषा आणि वरुण यांचा साखरपुडा 23 जानेवारी 2015 रोजी पार पडला.
5/8
दोघांच्या लग्नाची प्रचंड चर्चा रंगली होती. दरम्यान, काही महिन्यांनंतर त्यांचं नातं संपुष्टात आलं. रिपोर्ट्सनुसार, करिअर या कारणामुळे दोघांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.
6/8
असं म्हटलं जातं की, वरुण मनियांच्या कुटुंबाची अशी इच्छा होती की लग्नानंतर तृषा कृष्णने चित्रपटात काम करणे सोडून द्यावे. परंतु, अभिनेत्रीने तिच्या करिअरला प्राधान्य दिले.
7/8
नंतर एका मुलाखतीत, तृषा कृष्णने स्पष्ट केलं की, तिला कधीही अभिनय सोडायचा नव्हता. लग्न म्हणजे, चित्रपटांपासून दूर जाणं असेल तर, लग्नापेक्षा मी करिअर निवडेल, असं अभिनेत्री म्हणाली होती.
8/8
अभिनेत्रीचं वैयक्तिक आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. तिचं नाव विजय थलापतीशी जोडलं जात आहे.
Published at : 07 Mar 2026 11:03 AM (IST)