PHOTO: पांढऱ्या ड्रेसमध्ये टीना दत्ताने शेअर केला किलर लुक; चाहते घायाळ!
टीना दत्ताला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. प्रेक्षकांनी तिला प्रत्येक रूपात पसंत केले आहे. आता पुन्हा टीनाचा ट्रेडिशनल लूक पाहायला मिळाला आहे.
(फोटो सौजन्य : tinadatta/इंस्टाग्राम)
1/6
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री टीना दत्ता हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. 'उतरन ' या मालिकेत तिने इच्छा नावाच्या मुलीची भूमिका इतकी सुंदर साकारली होती की आजही लोक तिला याच नावाने ओळखतात. (फोटो सौजन्य : tinadatta/इंस्टाग्राम)
2/6
प्रेक्षकांनी तिला प्रत्येक रूपात पसंत केले आहे. शोमध्ये सुसंस्कृत सून आणि मुलगी म्हणून ओळख निर्माण करणारी टीना खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे. (फोटो सौजन्य : tinadatta/इंस्टाग्राम)
3/6
आता पुन्हा टीनाचा ट्रेडिशनल लूक पाहायला मिळाला आहे.टीनाने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केलेली दिसत आहे. या सिंपल लूकमध्ये टीना नेहमीप्रमाणे खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य : tinadatta/इंस्टाग्राम)
4/6
लूक पूर्ण करण्यासाठी, टीनाने हलका मेकअप केला आणि तिचे केस कर्ल केले आहेत. कपाळावर एक छोटी टिकली आणि कानात मोठे झुमके तिच्या लुकमध्ये भर घालत आहेत. (फोटो सौजन्य : tinadatta/इंस्टाग्राम)
5/6
फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'तुमच्या सकाळची सुरुवात हसून आणि सकारात्मकतेने करा.' (फोटो सौजन्य : tinadatta/इंस्टाग्राम)
6/6
आता तिचा हा लूक चाहत्यांनाही खूप आवडला आहे. या फोटोंवर काही तासांतच हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. (फोटो सौजन्य : tinadatta/इंस्टाग्राम)
Published at : 17 Aug 2022 11:47 AM (IST)