'या' कलाकारांनी एकनाथ शिंदेंच्या चित्रपट सेनेत केला प्रवेश

मराठी मनोरंजनसृष्टीतील हार्दिक जोशी , आदिती सारंगधर , माधव देवचके , अमोल नाईक, प्रतीक पाटील या कलाकारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

chitrapat sena

1/10
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिव चित्रपट सेनेच्या लोगोचं अनावरण केलं आहे.
2/10
दरम्यान मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकरांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
3/10
मराठी मनोरंजनसृष्टीतील हार्दिक जोशी , आदिती सारंगधर , माधव देवचके , अमोल नाईक, प्रतीक पाटील या कलाकारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
4/10
मराठी सेलिब्रिटींचे शिंदे गटात प्रवेश करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
5/10
शिंदे गटात प्रवेश करण्याबद्दल हार्दिक जोशी म्हणाला,"आजवर प्रेक्षकांसाठी काम केलं आहे. आता पडद्यामागून काम करणाऱ्या कलाकारांसाठी काम करायची इच्छा आहे. आता राजकारणात प्रवेश केल्याने ते काम करण्याची संधी मिळणार आहे".
6/10
आदिती सारंगधर म्हणाली,"शिदे साहेब हे एकच नेते असे आहेत जे कधीही सर्वसामान्यांपर्यंत पोचू शकणारे आहेत. त्यामुळे आता शिंदे गटात प्रवेश केला आहे".
7/10
गेल्या काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या शिवसेनेकडून चित्रपट सेनेची स्थापना करण्यात आली आहे.
8/10
एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत कलाकारांना राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
9/10
एकनाथ शिंदेंनी लिहिलं आहे,"शिवसेना कायमच मराठी कलाकारांच्या पाठीशी ठामपणे उभी असून चित्रपट क्षेत्रातील कलाकार आणि काम करणारे तंत्रज्ञ यांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठीच शिवसेना चित्रपट सेनेची स्थापना करण्यात आली आहे".
10/10
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले,"चित्रपट सृष्टीतील कामगार, तंत्रज्ञ यांचेही प्रश्न सुटावेट अशी अपेक्षा आहे".
Sponsored Links by Taboola