Zee Marathi Hamlet : उद्या झी मराठीवर होणार अजरामर 'हॅम्लेट' नाटकाचा वर्ल्ड टेलीव्हीजन प्रीमिअर
झी मराठी त्यांची पहिली नाट्यप्रस्तुती हॅम्लेट नाटक घेऊन छोट्या पडद्यावर येणार आहे. उद्या या अजरामर नाटकाचा वर्ल्ड टेलीव्हीजन प्रीमिअर असणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनामुळे नाट्यगृहे बंद असल्याने नाट्यवेडे रसिक प्रेक्षक दर्जेदार नाटकांना मुकत होते. त्यामुळे झी मराठी प्रेक्षकांसाठी 'हॅम्लेट'ची नाट्यकृती घेऊन छोट्या पडद्यावर आले आहे. दुपारी 12 आणि संध्याकाळी 7 वाजता प्रेक्षकांना नाटक पाहता येणार आहे.
विल्यम शेक्सपिअर लिखित, चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित हे नाटक आहे. 60 वर्षांपूर्वी नाना जोग, दामू केंकरे यांनी केलेल्या या नाटकाचे पुनर्लेखन 'प्रशांत दळवी' यांनी केले आहे.
कोरोनाआधी या नाटकाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे झी मराठी वाहिनीने या नाटकानंतर अनेक नाटकं रंगभूमीवर आणण्याचे शिवधनुष्य उचलले होते.
नाटकात हॅम्लेटची भूमिका सुमित राघवनने साकारली होती. तर तुषार दळवी, सुनील तावडे, भूषण प्रधान, आशिष कुलकर्णी, ओंकार कुलकर्णी, रणजीत जोग, मनवा नाईक, मुग्धा गोडबोले अशा नाटक जगणाऱ्या कलाकारांच्या यात मुख्य भूमिका आहेत.
हॅम्लेट नाटकाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले,कालातीत अशी ओळख असलेले 'हॅम्लेट' नाटक साकारावे असे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. रंगमंचावरून आता हे नाटक टेलिव्हिजनच्या माध्यमातून थेट प्रेक्षकांच्या घरी पोहोचणार आहे.
हॅम्लेट नाटकाचे संगीत राहुल रानडेंनी दिले होते. प्रदीप मुळ्ये यांनी या नाटकाचा डोळे दिपवणारा भव्य दिव्य सेट उभारला होता. त्यामुळे हे नाटक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले होते. या नाटकातील टू बी ऑर नॉट टू बी या डायलॉगचा देखील एक चाहतावर्ग आहे.