रंगभूमीवरील 'महिला'राज
पाच अभिनेत्रींची मुख्य भूमिका असलेलं 'सेल्फी' हे नाटक आहे. शिल्पा नवलकर, सुकन्या मोने, पूर्वा गोखले, सोनाली पंडित आणि ऋतुजा देशमुख अशा एकमेकींच्या खास मैत्रिणी असलेल्या खास अभिनेत्रींचं हे नाटक आहे. घट्ट मैत्री असलेल्या या अभिनेत्रींच्या नाटकाला प्रेक्षकदेखील तुफान गर्दी करायचे. त्यांची मैत्री इतकी घट्ट आहे की त्यांच्यात भांडणाचा सूर कधी लागतच नाही. या नाटकाची खासियत म्हणजे हे नाटक शिल्पा नवलकरने स्वत: लिहिले. आणि तिने फ्रेंडशिप डेच्या दिवशी या नाटकाची संहिता तिच्या मैत्रिणींना भेट म्हणून दिली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'चारचौघी' प्रशांत दळवी लिखीत 'चारचौघी' या नाटकात वंदना गुप्ते, आसावरी जोशी, प्रतीक्षा लोणकर, दीपा श्रीराम अशा दिग्गज अभिनेत्रींची फळी आहे. नाटकाचा विषय अगदी चाकोरीबाहेरचा, वास्तवाच्या गाभ्याला हात घालणारा असा धक्कादायक आहे. विवाहसंस्था ही केवळ समाजधारणा करणारी एक सामाजिक संस्था नसून तर तो दोन व्यक्तींमधला एकमेकांच्या संमतीने केलेला नाजूक करार असतो. वैवाहिक समस्येने घेरलेल्या जिवंत, रसरशीत व्यक्तीरेखा नाटकात दिसून येतात.
'अनन्या' या नाटकात ऋतुजा बागवे मुख्य भूमिकेत आहे. एका सामान्य मुलीची असामान्य गोष्ट सांगणारं अनन्या हे नाटक प्रेक्षकांना फार आवडलं. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीचा अचानक अपघात होतो. ती दोन्ही हात गमावते. त्यावर खचून न जाता ती स्वत:ला सावरते, त्यातून बाहेर पडते आणि आयुष्यात यशस्वी देखील होते. नाटकात ऋतुजा बागवे सोबत अनघा भगरे सहाय्यक भूमिकेत दिसून येते.
'तिला काही सांगायचय' या नाटकात तेजश्री प्रधान मुख्य भूमिकेत आहे. नाटकातल्या तिला फार काही जगावेगळं, क्रांतीकारक सांगायचं नाही. पण ती जे काही सांगते ते पोटतिडकीने सांगते. एक नीट रचलेली गोष्ट चोख सादर केली तर ती चांगला नाट्यपरिणाम साधू शकेल याचा प्रत्यय 'तिला काही सांगायचय' नाटक पाहताना दिसून येतो. नवरा-बायकोची गोष्ट आणि त्यांच्यात शिरलेल्या संशय नावाच्या किड्याची मांडणी लेखक, दिग्दर्शक हेमंत एदलाबादकर यांनी योग्यरितीने मांडली आहे.
संत तुकाराम आणि विठ्ठलामधील नातं सांगणारं 'संगीत नाटक' म्हणजे 'संगीत देवबाभळी'. नाटकात विठ्ठल आणि भक्तांच्या पत्नी अवली आणि रखुमाई यांच्यामधील नाते हळूहळू उलगडत जाते. एकमेकांची दु:ख, एकमेकींना मदत करण्याची तयारी, विठ्ठलाची ओढ या सगळ्या गोष्टींची मांडणी लेखकानं अचूक केली आहे. मानसी जोशी आणि शुभांगी सदावर्ते या मुख्य भूमिकेत असून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -