Vaibhav Mangale : 'अलबत्या गलबत्या' बालनाट्य पुन्हा एकदा रंगभूमीवर, दिवाळीत बच्चेकंपनीला पाहता येणार खट्याळ चेटकिणीची धमाल गोष्ट
वैभव मांगलेने सोशल मीडियावर चेटकीणीच्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोवर त्याने कॅप्शन लिहिली आहे,मी येत आहे दिवाळीत तुमच्या भेटीला...तयार राहा. (Photo : Vaibhav Mangale/Facebook)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवैभव मांगले साकारत असलेली चिंची चेटकीण बालप्रेक्षकांना कधी हसवते तर कधी घाबरवते. लहानांसोबत मोठ्यांनादेखील हे बालनाट्य प्रचंड आवडते.(Photo : Vaibhav Mangale/Facebook)
चेटकीण परत येत आहे..तिने यावं की न यावं...काय वाटतं तुम्हाला असा प्रश्न वैभव मांगलेने प्रेक्षकांना विचारला होता.(Photo : albatyagalbatya/FB)
वैभव मांगलेने विचारलेल्या प्रश्नावर चाहते कमेंट्स करत आहेत,ये गं बाई स्वागत आहे तुझं, चेटकीणीने आधी कोरोनाची सुपारी घ्यावी, बाळ गोपाळांना 2 डोस टोचावेत मग खुशाल हाऊसफुलचा बोर्ड लावून स्टेजवर मुक्काम ठोकावा. (Photo : albatyagalbatya/FB)
'अलबत्या गलबत्या' या बालनाट्याची निर्मिती झी मराठी आणि अद्वेत थिएटरने केली आहे. या बालनाट्याचे लेखन रत्नाकर मतकरींनी केले आहे. तर दिग्दर्शन चिन्मय मांडलेकरने केले आहे. (Photo : albatyagalbatya/FB)
पहिल्या लॉकडाउन नंतर अलबत्या गलबत्या बालनाट्याची जाहीरात करण्यात आली होती. त्यात एकदा का कोरोना गेला की पुन्हा सुरू होणार...जादूच्या आगपेटीचा नाद सोडेल ती चिंची चेटकीण कसली...'किती गं बाई मी हुशार, किती गं बाई मी हुशार' अशा जाहिराती करण्यात आल्या होत्या. (Photo : albatyagalbatya/FB)
'अलबत्या गलबत्या' बालनाट्य 1972 साली पहिल्यांदा रंगभूमीवर आले होते. वैभव मांगलेंनी साकारलेली चिंची चेटकीण त्यावेळी दिलिप प्रभावळकर साकारत होते(Photo : albatyagalbatya/FB)